Jagala Pokharanari Davi Valavi By Abhijit Joag (जगाला पोखरणारी डावी वाळवी )
Jagala Pokharanari Davi Valavi By Abhijit Joag (जगाला पोखरणारी डावी वाळवी )
Couldn't load pickup availability
जगाच्या सांस्कृतिक इतिहासामधले जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते ते नष्ट करून त्या जागी अराजकता, हिंसा आणि हुकूमशाहीचे अधिष्ठान करणे म्हणजेच साम्यवाद !
अभिजित जोग यांनी या पुस्तकात साम्यवाद नावाच्या ह्या संपूर्ण जग पोखरणाऱ्या वाळवीचा मुळापासून वेध घेऊन आज जगात आणि भारतात साम्यवादाच्या नावाखाली जी नृशंस हिंसा घडवून आणली जातेय त्याचा अतिशय परिणामकारक पर्दाफाश केला आहे.
वाळवी हे पुस्तक अस्वस्थ करते आणि येणाऱ्या धोक्याची जाणीव करून देते. हे पुस्तक निव्वळ विरंगुळा म्हणून वाचण्यासारखं नाही, तर विचार करायला लावणारं आहे. पार जर्मन पेझंट वॉर पासून सुरू करून फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती ते नाझीवाद ते आजकालची ब्लॅक लाईव्हज मॅटर ते भारतातले अँटी फार्मर्स बिल प्रोटेस्ट इथपर्यंतचे समर्पक दाखले देऊन लेखक अभिजित जोग यांनी अतिरेकी साम्यवादी चळवळी, प्रत्येक मानवतावादी चळवळीत घुसून त्या चळवळीचे विकृतीकरण कसे करतात हे सोदाहरण दाखवलेले आहे.
अत्यंत सोप्या भाषेत, समर्पक उदाहरणं देत लिहिलेले हे पुस्तक कुठेही अभ्यासात मागे पडत नाही हे लेखक म्हणून अभिजित जोग यांचे निश्चितच यश आहे.