Jaanata Ajaanata, Ayushyane Dilele Dhade By Anupam Kher (जाणता अजाणता…आयुष्याने दिलेले धडे)
Jaanata Ajaanata, Ayushyane Dilele Dhade By Anupam Kher (जाणता अजाणता…आयुष्याने दिलेले धडे)
Couldn't load pickup availability
ही अखेर नक्कीच नाही.
अजून कितीतरी नवी क्षितिजे कवेत घ्यायची आहेत.
आणि तीसुद्धा या एकाच आयुष्यात! शक्यता अनंत आहेत.
आणि माझी भावी पटकथा अजून लिहिलेलीसुद्धा नाहीये.
माझे आयुष्य परिमित नाही, सीमित नाही, परिभाषित नाही.
माझे आयुष्य मुक्त आहे, अनंत आहे व अपरिमेय आहे.
पडद्यामागील रोचक कथा-किस्से आणि आयुष्यात मिळालेल्या अनुभवांचे दुर्मीळ, मौल्यवान संचित उलगडणारी विलक्षण, रंजक व दिलखुलास कहाणी…
अनुपम खेर यांच्या जीवनाची कथा बॉक्स ऑफिसवर ‘हिट’ ठरलेल्या एखाद्या जबरदस्त मसाला सिनेमासारखीच आहे. त्यामध्ये नाट्य आहे, विनोद, रोमान्स आणि ‘अॅक्शन’सुद्धा आहे! शिमल्यासारख्या छोट्याशा गावातला हा मुलगा आज जगातील सर्वांत मान्यताप्राप्त अभिनेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आणि सिनेमा व कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरला!
प्रतिभेची खाण असलेल्या या अभिनेत्याच्या नावावर सुमारे 530 सिनेमे जमा आहेत (ही संख्या आणखी वाढते आहे). अनुपम खेर केवळ त्यांच्या तुळतुळीत डोक्यामुळेच नव्हे तर त्यांचा परखड दृष्टिकोन व बेधडक मतांमुळेही वेगळे उठून दिसतात. साहजिकच त्यांचे आत्मचरित्रही तसेच आहे… हा त्यांच्या आयुष्यातील नुसता घटनाक्रम नाही तर या आत्मकथेद्वारे त्यांनी आयुष्यात मिळालेल्या धड्यांचे संचित उलगडले आहे. त्यामुळे हे आत्मकथन कलाकार बनण्याची आकांक्षा असलेल्या प्रत्येकाच्या व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसाच्या मनाचा नक्कीच ठाव घेईल.
Share
