Iye Kirtan Vidya Mandiri By Vishnubuva Shetgaonkar (इये कीर्तन विद्या मंदिरी – विष्णुबुवा शेटगांवकर)
Iye Kirtan Vidya Mandiri By Vishnubuva Shetgaonkar (इये कीर्तन विद्या मंदिरी – विष्णुबुवा शेटगांवकर)
Couldn't load pickup availability
मनोगत
कीर्तन प्रेमी सज्जन हो !
कीर्तन क्षेत्रात मी गेली चाळीस वर्षे कार्यरत आहे. कला अकादमी पणजी आयोजित सर्व कीर्तन महोत्सव, हरिभक्त परिषद, गोमंतक आयोजित सर्व कीर्तनकार स्नेहसंमेलनात मी सहभागी झालो आहे. कोल्हापूर व सांगली येथे आयोजित अखिल भारतीय कीर्तनकार संमेलनात सहभागी होण्याचे भाग्यही मला लाभलेले आहे. कला व संस्कृती संचालनालय तसेच कला अकादमी पणजी आयोजित कीर्तन कार्यशाळांमध्येही मी सहभागी झालेलो आहे. अग्रगण्य, नामवंत व नवोदित कीर्तनकारांची कीर्तने खूपवर्षे श्रवण करण्याचे भाग्यही मला लाभले आहे. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकच्या काही भागांत मी गेली चाळीस वर्षे हजारो कीर्तने सादर केली आहेत.
कीर्तनप्रेमी मला माझ्या कीर्तन कॅसेट बाबत विचारायचे. गोवा कला व संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक माननीय श्री. अशोक परब सर, प्रसिद्ध लेखक, शिक्षणतज्ज्ञ श्री. मनोहर कोरगांवकर मला नेहमीच 'बुवा कीर्तनाचे पूर्वरंग व आख्याने असलेले एखादे पुस्तक प्रसिद्ध करा.' असा मौलिक उपदेश करायचे. त्यांच्या प्रेमळ आग्रह व प्रोत्साहनामुळे हे पुस्तक साकार करण्याचे साहस मी केले आहे.
पाने 178
Share
