Itihasatil Navalkatha Bhag (1 + 2)+ Paris Sangrahalayatil Chhatrapati Shivaji Maharaj Yanchi Bakhar+Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj | By Dr. Avinash Sowani+Guruprasad Kanitkar,+Krushnarav Arjun Keluskar
Itihasatil Navalkatha Bhag (1 + 2)+ Paris Sangrahalayatil Chhatrapati Shivaji Maharaj Yanchi Bakhar+Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj | By Dr. Avinash Sowani+Guruprasad Kanitkar,+Krushnarav Arjun Keluskar
Couldn't load pickup availability
मराठ्यांच्या इतिहासातील लहानमोठ्या नवलाईच्या कथांचा हा संग्रह आहे. या पुस्तकात, अनेक वीरांच्या, मुत्सद्यांच्या आणि सर्वसामान्य परंतु असामान्य कामगिरी करणार्या सैनिकांच्या या कथा आहेत. पराक्रम, शौर्य, स्वामानिष्ठा, राज्यनिष्ठा, बलिदान आणि चातुर्य अशा विविध पैलूंनी सजलेल्या या कथा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
पॅरिस मधील Bibliothèque Nationale De France (BnF) येथील Manuscripts Department मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही बखर आहे. ही बखर साधारणपणे १७५० सालच्या आसपास लिहिली गेली असावी व ती आज प्रसिद्ध असणाऱ्या सर्व ९१ कलमी बखरींची पूर्वसूरी असावी. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली.
Share
