Skip to product information
1 of 1

Ithe Nandato Dushkal By Ramakant Kulkarni (इथे नांदतो दुष्काळ)

Ithe Nandato Dushkal By Ramakant Kulkarni (इथे नांदतो दुष्काळ)

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचं वास्तव समजून घेण्यासाठी नगरपासून वर्ध्यापर्यंत एक पदयात्रा काढली गेली. हजारभर किलोमीटरचा पायी प्रवास करत. साठ गावांमध्ये मुक्काम करत आणि वाटेत लागणाऱ्या गावांशी संवाद साधत ही पदयात्रा पार पडली. या पदयात्रींना महाराष्ट्राचं चित्र कसं दिसलं? न परवडणारी शेती जशी त्यांना दिसली, तशीच कमालीची विषमाताही जाणवली. मोडकळीला आलेल्या शाळा जशा दिसल्या. तशीच जवळपास बंद अवस्थेतील सार्वनिक आरोग्य केंद्रंही दिसली. धनदांडग्यांकडून होणारं शोषण जसं दिसलं, तसंच माणसाला माणसाप्रमाणे जगू न देणारी अस्पृश्यताही दिसली. या सर्व परिस्थितीबद्दल लोकांमध्ये असलेली चीड दिसली आणि हे प्रश्न सुटायला हवेत अशी इच्छाही. पण प्रकर्षाने जाणवली ती जनतेने स्वीकारलेली ‘दिल्या परिस्थितीत’ नांदण्याची असहाय तडजोड.प्रगत राज्याच्या स्वप्नात रमलेल्या महाराष्ट्राला खडबडून जागं करणारं एका पदयात्रीने घडवलेलं हे सार्वत्रिक ‘दुष्काळ’दर्शन.

View full details