Indica By Pranay Lal Author,Nanda Khare (Translator)
Indica By Pranay Lal Author,Nanda Khare (Translator)
तुम्हाला माहिती आहे का वेरूळची अप्रतिम लेणी ज्या खडकातून कोरून काढली आहेत तो खडक आत्तापर्यंत जगात घडून आलेल्या सर्वात मोठ्या लाव्हारसाच्या पुरातून निर्माण झाला आहे. ज्वालामुखीचा हा स्फोट एवढा प्रचंड होता कि, त्याच्यामुळे डायनॉसॉरही नष्ट होऊ शकले असते, हे माहिती आहे का तुम्हाला? आजच्या बंगळूरच आगळं वेगळं हवामान ८.८कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात घडून आलेल्या घडामोडींमुळेच निर्माण झालं आहे हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? एवढंच नव्हे तर गंगा आणि ब्रम्हपुत्रा जवळजवळ २० टक्के जागतिक कार्बन अलग करतात आणि लाखो वर्षांपासूनच्या त्यांच्या गाळाने बंगालच्या उपसागराच्या तळाशी ग्रँड कॅनियनपेक्षाही मोठमोठ्या दऱ्या निर्माण केल्या आहेत. हे ठाऊक आहे का तुम्हाला? तसेच राजसौरास नावाचा भारतीय प्रदेशातील डायनासॉर कदाचित टिरेक्सपेक्षाही भीषण होता हे कधी ऐकलंय का तुम्ही? अशा कित्येक थक्क करणाऱ्या गोष्टी आणि शोध आहेत. उदारणार्थ, मुंबईत ७ कोटी वर्षांपूर्वी मगरीची अंडी सापडली आहेत, तसंच डायनॉसॉरचं घरटी बांधण्याचं ठिकाण अहमदाबादजवळ होतं ……भारतीय उपखंडाचा सखोल नैसार्गिग इतिहास सांगणाऱ्या ‘इंडिका’ चे हे सगळे भाग आहेत.