Hrady By Rekha Inamdar - Sane (हृद्य)
Hrady By Rekha Inamdar - Sane (हृद्य)
Couldn't load pickup availability
रेखा इनामदार-साने या मनस्वी लेखिका, प्राध्यापिका आणि समीक्षक आहेत. विविध साहित्य-संस्कृती-संगीत वर्तुळांमध्ये उत्साहाने वावरणाऱ्या एक कलासक्त रसिक आहेत. या वर्तुळांमध्ये परिघांवर आणि आतील त्रिज्यांवर जी अनेक सर्जनशील माणसे त्यांना भेटली वा त्या आवर्जून त्यांना भेटल्या, अशा माणसांचे समांतर विश्व त्यांनी या ‘हृद्य’मध्ये उभे केले आहे.
रेखा यांना परकायाप्रवेशाची वा परअंतर्ज्ञानाची सिद्धी प्राप्त झालेली नाही. केवळ कुतूहल, सांस्कृतिक जिज्ञासा आणि प्रेम या बळावर त्यांनी या पुस्तकात बारा विविधरंगी, विविधढंगी माणसांचा शैलीदार, चिकित्सक आणि मनोविश्लेषणात्मक कॅलिडोस्कोपिक कॅनव्हास रेखाटला आहे. या कॅनव्हासवर लेखिकेने या व्यक्तींचे स्वभाव, कार्यशैली, त्यांचे कौटुंबिक व सामाजिक जीवन आणि त्यांचा मित्रपरिवार यांचे रंग अतिशय आत्मीयतेने तसेच चिकित्सकपणे भरले आहेत.
मी यापैकी बहुतेकांना बऱ्यापैकी ओळखतो; परंतु त्यांच्याबद्दलचे लेखिकेने केलेले वर्णन-विश्लेषण वाचून मला जाणवले की, मला त्यांची खरी ओळखच झाली नव्हती. माझ्या मनातली त्यांची शिल्पे ‘हृद्दा’ वाचल्यानंतर अधिक ठसठशीत झाली आहेत. ज्या वाचकांना ही माणसे माहीत नसतील, त्यांनाही हा पूर्ण सांस्कृतिक कॅनव्हास विलोभनीय वाटेल.
-कुमार केतकर
Share
