Skip to product information
1 of 1

Hound of the Baskerville By Prof Bhalba Kelkar

Hound of the Baskerville By Prof Bhalba Kelkar

Regular price Rs. 102.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 102.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

पाश्चात्य महिला कधी कधी मन:पूर्वक भारतीय साज चढवते त्यावेळेला ती संभ्रम पडेल अशी पूर्ण भारतीयच वाटते. अशीच काहीशी स्थिती माझ्या या कादंबरिकेबाबत झाली आहे. कारण इंग्लंडमधल्या एका दंतकथेवर आधारलेल्या गुप्तचर कथेला चढवलेला भारतीय मराठी साज म्हणजे माझी ही प्रस्तुत कादंबरिका. अर्थात हा साज चढवताना मी अत्यंत आवश्यक असं बरंच स्वातंत्र्य घेतलं आहे. पुण्या-मुंबईच्या रेल्वे प्रवासातला एक अनुभव त्यात जरा फुलवून वापरला आहे. त्याचप्रमाणे कथेला प्रारंभ मूळ दंतकथेच्या पूर्ण भारतीय ऐतिहासिक स्वरूपापासून केला आहे. कथा घडते तो परिसरही मूळ कथेतल्या परिसरापेक्षा साफ बदलून टाकला आहे. अनेक व्यक्तिरेखांचे स्वभाव-परिपोष आणि प्रत्यक्ष वागणूक यातही खूपच स्वातंत्र्य घेऊन बदल केले आहेत. कथेतल्या घडणाऱ्या घटना मराठी साज चढवताना थोड्या पुढेमागे केल्या आहेत. तपशीलातला काही ठिकाणचा बदल अपरिहार्य होता. कथेचा मराठी स्वरूपातील आविष्कार, शेवटही थोडा बदलावा म्हणून मागणी करीत होता. त्याप्रमाणे मूळ शेवटाचं स्वरूप थोडं बदलून तो थोडा ठळक करणं आणि मराठी वाचकांना जास्त सहज भिडेल असा करण्याचं स्वातंत्र्य घेणं हे अगदी अटळ होतं. अर्थात असे सारे साज चढवताना, मूळ कथेतला पायाभूत गाभा मी शक्यतो कायमच ठेवला. मनूष्यस्वभावातल्या काही शाश्वत वाटणाऱ्या वृत्ती मी तशाच प्रकट होतील असा कटाक्ष बाळगला, कथेतल्या व्यक्तिरेखांची संख्याही मी तीच ठेवली. फक्त स्वातंत्र्य घेतलं ते घटनांच्या बाबतीत. मूळ कथा थोडी ठळकही केली. अर्थात मराठी वाचकाचा स्वभाव, अभिरूची आणि सर्वसाधारण अपेक्षा लक्षात घेऊन मी हे स्वातंत्र्य घेतलं, मूळ महान कथेत काही सुधारणा म्हणून नव्हे, हे कृपया वाचकांनी ध्यानात घ्यावं, ही माझी नम्र विनंती आहे. खरंच असं घडलं असेल का? अशी शंका येऊन कुतूहल वाढेल, असं मूळ कथेतलं वातावरण या मराठी स्वरूपात कायम राहील असा जरा ओळखीचा परिसर मी निवडला आणि ती मराठी रूपात वाचकांना सादर केली आहे. मूळ लेखकाला अभिवादन करण्यासाठी व मला उत्तेजन देण्यासाठी सहृदय वाचक ही माझी छोटीशी वाङ्मकृती गोड मानून घेतील अशी माझी खात्री आहे.

View full details