Homo Dues (Marathi) By Yuval Noah Harari ,Translator Sushrut Kulkarni
Homo Dues (Marathi) By Yuval Noah Harari ,Translator Sushrut Kulkarni
युवाल नोआ हरारी यांनी 'सेपियन्स' मधून मानवाची उत्क्रांती सांगत देव, धर्म, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य अशा संकल्पना निर्माण करून त्याने जग कसे काबीज केले, याचे वर्णन केले आहे. नोआल यांनी त्यांचे पुढील पुस्तक 'होमो डेअस' मधून तिसऱ्या सहस्रकात मानवासमोरील दुष्काळ, साथीचे रोग आणि युद्ध या संकटाची चर्चा करीत मानवाने त्यावर मिळविलेले नियंत्रण कसे आणले हे स्पष्ट केले आहे. होमो सेपियन्स हे सर्वात विकसित रूप कसे आहे, मनुष्य व अन्य प्राण्यांमधील फरक, त्यांनी जगाला दिलेला नवा अर्थ, देव - धर्म यापलीकडे तंत्रज्ञान, बुद्धिमान रचनांमधील नव्या संकल्पना या पुस्तकातून स्पष्ट केल्या आहेत. एकविसाव्या शतकातील स्वप्न आणि दुःस्वप्न यांचा मागोवा घेत सामोरे जाव्या लागणाऱ्या भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केली आहे. म्हणूनच उत्क्रांतीचा पुढचा टप्पा हा होमो डेअस असेल, देव-माणसाचा असेल, असे यात म्हटले आहे. याचा मराठी अनुवाद सुश्रुत कुलकर्णी यांनी केला आहे.