Historical book set ( 4 Books) ( शिवरायांचे रणतांडव + गुप्तहेर बहिर्जी नाईक + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज + शिवचरित्र)
Historical book set ( 4 Books) ( शिवरायांचे रणतांडव + गुप्तहेर बहिर्जी नाईक + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज + शिवचरित्र)
Couldn't load pickup availability
1) शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे - 399/-
पाने - २८०
नोव्हेंबर १६५९मध्ये एक वेळ अशी आली होती की, काळ जणू क्षणभर थांबला होता. तो काळ, या भूमीचा इतिहास आणि मराठ्यांच्या माना अभिमानाने उंचावणारा ठरला. पण हा अभिमान मराठ्यांना सहज मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांच्या राजेश्री स्वामींचे प्राण पणाला लागले होते. सवर्दूर भयाण अंध:कार आणि त्यात पेटणारी इवलीशी ज्योत इतकेच त्यावेळी मराठ्यांचे अस्तित्व होते. पण त्या एका घटनेनंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि सारे जग मराठ्यांच्या पराक्रमाला मुजरा करु लागले. मराठ्यांच्या राजेश्री स्वामींच्या पराक्रमाला...
अफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.
खानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.
पण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी!
पन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!
त्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!
रक्त, रण आणि रहस्य यात तुडुंब भिजलेली ही कादंबरी म्हणजेच...
'शिवरायांचे रणतांडव'
2) गुप्तहेर बहिर्जी नाईक |लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप - 399/-
पाने - ३२०
मी बहिर्जी नाईक,
स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या. माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....
3) स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंके
पाने - १६० | 250/-
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.
'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते.
हे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न.
ज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......
4) शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी
पाने - १६८ | 250/-
'छत्रपती शिवाजी महाराज!'
हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो.
हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.
Share
