Hindutva Bandhutva aani Narendra Modi By Dr. Shripal Sabnis (हिंदुत्व बंधुत्व आणि नरेंद्र मोदी)
Hindutva Bandhutva aani Narendra Modi By Dr. Shripal Sabnis (हिंदुत्व बंधुत्व आणि नरेंद्र मोदी)
Couldn't load pickup availability
हिंदुत्वातील बंधुत्वाचा विश्वास प्रत्येक वेळी प्रत्येकाला देता येणार नाहीच, पण 'बंधुत्वातले हिंदुत्व' मात्र सर्वसाक्षी ठरू शकते. शिवाय 'धर्मसंकल्पनात्मक हिंदुत्व' भारतीय संविधानाला अमान्य असून 'बंधुत्व' तर लोकशाहीचाच गाभा आहे आणि माझ्या भूमिकेचा प्राण आहे.
नरेंद्र मोदींचा 'गोध्रा' ते 'पंतप्रधान' हा प्रवास, विकास मानायचा का? मोदींचे हिंदुत्व खरंच भारतीयत्वात रूपांतरित झालंय का? 'मोदी मॉडेल' आणि 'भागवत मॉडेल' यातील सूक्ष्म संघर्ष कोणता? हिंदुत्ववादी मोदींच्या तोंडी गांधी आणि बुद्धाचा 'जप' परदेशातच अधिक का असतो? मोदींचे परराष्ट्र धोरण पं. नेहरूच्या वारशातच समृद्ध झालेय का? पंतप्रधान मोदी देशांतर्गत प्रश्नांवर पराभूत आहेत का? त्यांच्या हातात भारताचे सार्वभौमत्व सुरक्षित आहे का?
अशा असंख्य प्रश्नांच्या संदभनि २०१३-२१ पर्यंतचे माझे चिंतन या ग्रंथात मुक्तपणे व्यक्त झालेय, सदरचे लेख मागच्या ७-८ वर्षात वेगवेगळ्या कारणाने लिहिले होते. मी विधबंधुत्ववादी आहे. सबब, नरेंद्र मोदींची 'घाटगिरी' मला शक्य नाही. पण मी त्यांचा शत्रूही नाही. मी बहुसांस्कृतिक एकतेचा विश्वधर्म मानतो.
Share
