Hati Jyanchya Shunya Hote By Shevate Arun
Hati Jyanchya Shunya Hote By Shevate Arun
Couldn't load pickup availability
स्टीव्ह जॉब्ज : कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवले. अब्राहम लिंकन : पोस्टमास्तर होते. शेक्सपिअर : खाटिकखान्यात नोकरी केली. ए.पी.जे.अब्दुल कलाम : विद्यार्थीदशेत रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्रे विकली. लता मंगेशकर : कोल्हापुरला स्टुडिओत नोकरी केली. एम.एफ.हुसेन : फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली. धीरुभाई अंबाणी : पेट्रोलपंपावर क्लार्क होते. ग.दि.माडगूळकर : नापास झाल्यावर उदबत्या विकल्या. सुधीर फडके : चहाभाजीचा व्यापार केला. गुलज़ार : मोटारगॅरेजमध्ये नोकरी केली. ग्रेटा गार्बो : दुकानात सेल्सगर्ल होती. निळू फुले : कॉलेजमध्ये अकरा वर्षे माळी होते. सुशीलकुमार शिंदे : कोर्टात शिपाई होते. कर्मवीर भाऊराव पाटील : नांगर व कंदीलाचे विक्रेते होते. जॉनी वॉकर : बस कंडक्टर होता. मेहमूद : ड्रायव्हर होता. या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शून्य होते. त्यांनी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले. तरुणांपुढे आदर्श ठेवला. तुम्हीसुध्दा हाती शून्य असतांना स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करु शकता.