Hamkhas Vajan Kami Kara By Dr. Shankararao Potdar (हमखास वजन कमी करा)
Hamkhas Vajan Kami Kara By Dr. Shankararao Potdar (हमखास वजन कमी करा)
Couldn't load pickup availability
गेल्या चार दशकात आपली जीवनशैली आमूलाग्र बदलली आणि या बदललेल्या जीवनशैलीचे 'बायप्रॉडक्ट' म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा ही समस्या फक्त दिसण्याशी निगडित नसून अनेक मोठ्या आजारांशी निगडित आहे. त्यामुळे अनेक मोठ्या आजारांवर मात करायची असेल, तर सर्वप्रथम लठ्ठपणाला आळा घालायला हवा.
या पुस्तकाच्या माध्यमातून लठ्ठपणा कमी कसा करायचा, याबाबतचे गैरसमज दूर होऊन निरामय आरोग्याबाबतची व्यापक दृष्टी वाचकांना मिळेल याची खात्री वाटते.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायामाचा कंटाळा असलेल्या व खाण्यावर नियंत्रण ठेवू न शकणाऱ्या लोकांना विविध गोळ्या, औषध बनवणारे सहज आपल्या जाळ्यात ओढतात व त्या जाळ्यात फसलेले लोक अनेक व्याधींना व परिणामांना आमंत्रण देतात. हे टाळावे म्हणून लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी आहारोपचार या पुस्तकात सविस्तर सांगितले आहेत. तसेच कमी कॅलरीजच्या; पण पौष्टिक पाककृती दिल्या असून व्यायामाचे महत्त्वही पटवून दिले आहे. लठ्ठपणा कमी करून आदर्श आरोग्यक्रांतीकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्यांना योग्य मार्गावर नेणारे उपयुक्त पुस्तक
Share
