Gupther Bahirji Naik By Navnath Jagtap, Arti Jagtap (गुप्तहेर बहिर्जी नाईक| लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप )
Gupther Bahirji Naik By Navnath Jagtap, Arti Jagtap (गुप्तहेर बहिर्जी नाईक| लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप )
Couldn't load pickup availability
गुप्तहेर बहिर्जी नाईक |लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप
बहिर्जी नाईक यांचे संपूर्ण चरित्र एकाच पुस्तकात.
पाने - ३२०
मी बहिर्जी नाईक,
स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या. माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....
Share
