Guntavnuksamrat Warren Buffett By Sudhir Rashingkar (गुंतवणूकसम्राट वॉरन बफे)
Guntavnuksamrat Warren Buffett By Sudhir Rashingkar (गुंतवणूकसम्राट वॉरन बफे)
Couldn't load pickup availability
खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टार्जित नफा मिळवणाऱ्या वॉरन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग वॉरनने यात जगावेगळं असं केलं तरी काय ?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसायजगतात सहसा दुर्मीळ असणाऱ्या नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच वॉरनच्या यशाचं वेगळेपण आहे. _ 'समभागधारक हेच कंपनीचे मालक' अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या वॉरनकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत. त्या साऱ्या वाचकांसमोर अलगद उलगडणारं हे पुस्तक!
विशेष म्हणजे वॉरनने सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या १० मार्गांसह!
Share
