Gunhyachya Pavulkhuna + Criminal Psychology + Cyber Security By Achyut Godbole, Paresh Chitnis, Dr. Amey Pangarkar (गुन्ह्याच्या पाऊलखुणा + क्रिमिनल सायकॉलॉजी)
Gunhyachya Pavulkhuna + Criminal Psychology + Cyber Security By Achyut Godbole, Paresh Chitnis, Dr. Amey Pangarkar (गुन्ह्याच्या पाऊलखुणा + क्रिमिनल सायकॉलॉजी)
Couldn't load pickup availability
Book Available after 13 december 2025
1) गुन्ह्याच्या पाऊलखुणा- गुन्ह्यांपासून अटकेपर्यंत : फॉरेन्सिक सायन्स/ सायकॉलॉजी याची रंजक कहाणी - पाने - ३०४ - 299/-
गुन्हेगार कितीही शहाणा असला तरी विज्ञान त्याला पकडणारच! 👣
🕵️ रक्ताचे थेंब, बोटांचे ठसे, डीएनए पुरावे – हे छोटे तपशील मोठे रहस्य उलगडतात!
या पुस्तकात वाचा फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीने सोडवलेल्या काही जबरदस्त क्रिमिनल केसेस!
📖 वास्तवावर आधारित, बुद्धीला चालना देणारे रहस्य!
प्रत्येक गुन्हेगार काही पुरावे मागे सोडून जातो. कधी ते चटकन सापडतात तर कधी पुरावे सापडायला काही वर्ष ही लागतात. सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यासाठी आणि गुन्हेगाराची ओळख निःसंशय पटवून देण्यासाठी न्यायव्यवस्था ज्या विज्ञानाचं सहाय्य घेते त्याला न्यायसाहाय्यक विज्ञान असं म्हणतात. चित्रपट आणि टी वी सीरियल्स मधून न्यायसाहाय्यक विज्ञानाची तोंड ओळख झाली असेलच. या पुस्तकात न्यायसाहाय्यक विज्ञानाची सखोल माहिती आणि फॉरेंसिक सायन्सच्या उपयोगाने सोडवलेल्या काही थरारक क्रिमिनल केसेस आहेत.
2) क्रिमिनल सायकॉलॉजी । लेखक - अच्युत गोडबोले, परेश चिटणीस
पाने - २८० - 350/-
गुन्हा घडतो तेव्हा तो लगेच सगळ्यांच्या नजरेत येतो. वृत्तपत्रात आणि चॅनेल वर बातम्या भरून जातात, लोक चर्चा करतात, आरोपीचे चेहरे झळकतात. पण त्या गुन्ह्याच्या आधी जे काही मनात घडत असतं, ते कुणाच्याच लक्षात येत नाही.
‘गुन्हेगारी मानसशास्त्र’ या पुस्तकात त्या अदृश्य जगाची दारं उघडली आहेत. प्रत्येक कथा एका खऱ्या गुन्ह्याने सुरू होते, पण ती संपते एका मानवी मनाच्या शोधात. मत्सर, लोभ, अपमान, एकाकीपणा, भीती, विकृती; माणसाच्या आत दडलेली ही सगळी बीजं गुन्ह्याच्या रूपात कशी बदलतात, हे या कथा शांतपणे सांगतात.
जॅक द रिपरच्या काळोख्या लंडनच्या गल्लीपासून ते मुंबईतील रामन राघवच्या झोपडपट्ट्यांपर्यंत, ऑटो शंकरच्या मद्रासमधल्या राजकीय-सामाजिक जाळ्यापासून ते बिहारच्या अमरजीत सदा या लहान खुनी मुलाच्या निरागस पण थंड मनापर्यंत — प्रत्येक कहाणी मन हादरवते.
सुरिंदर कोलीच्या क्रूरतेतून समाजाचं मौन दिसतं, अंद्री चीकातीलोच्या रशियातल्या हत्यांमधून एका तुटलेल्या युगाची निराशा, क्रिस्टा पाइकच्या तरुण मनातून सूडाचं विकृत सौंदर्य, तर जोशी-अभ्यंकर आणि रंगा-बिल्लाच्या भारतीय प्रकरणांतून शहरी गुन्हेगारीचं नागवं रूप समोर येतं. या आणि अश्या तीस गुन्हेगारी प्रकरणांनी हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं.
अच्युत गोडबोले यांच्या विचारपूर्ण, पण सहज आणि बोलक्या शैलीत या घटना जिवंत होतात. परेश चिटणीस यांच्या गुन्हेगारी मानसशास्त्रातील अनुभवातून त्या अधिक सखोल बनतात. हे पुस्तक थरारक गुन्ह्यांचं वर्णन करताना ; ते माणसाच्या मनातल्या सावल्यांकडे पाहायला शिकवतं.
वाचक गुन्ह्याच्या तपशीलांपेक्षा हळूहळू त्या मनात गुंतत जातो: त्या वेदनेत, रागात, भीतीत, आणि कधी कधी विकृतीत. वाचत राहावंसं वाटणारं, पण प्रत्येक पानानंतर विचार करायला भाग पाडणारं हे पुस्तक माणसाच्या मनाची एक गुंतागुंतीची सफर आहे; थक्क करणारी, अस्वस्थ करणारी, आणि म्हणूनच विसरता न येणारी.
3)सायबर सिक्युरिटी | लेखक - अच्युत गोडबोले, डॉ. अमेय पांगारकर
पाने - २६४ - 350/-
'सायबर सिक्युरिटी' म्हणजे फक्त संगणक प्रोग्रामर किंवा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचं काम नाही. ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण डिजिटल जग हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. या पुस्तकात आपण सायबर सिक्युरिटीचा इतिहास, सायबर सिक्युरिटीशी निगडित महत्त्वाच्या संज्ञा, आजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटीचं महत्त्व, आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीचे उपाय आणि भविष्यातली जागरूकता याबद्दल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्याबरोबरच तुम्हांला सायबर हल्ल्यांचे विविध प्रकार समजतील. फिशिंग, हॅकिंग, ओळख चोरी, डिजिटल अरेस्ट, UPI आणि ई-कॉमर्स फसवणूक, डीपफेक, जॉब स्कॅम्स आणि अजून बरंच काही ! प्रत्येक प्रकरण सोप्या उदाहरणांसह लिहिल्यामुळे वाचक फक्त माहितीच मिळवणार नाहीत, तर ते आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वापरू शकतील असे उपाय घेऊन जातील.
श्री. कैलाश काटकर
चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, क्विकहील टेक्नॉलॉजी लिमिटेड
Share
