Gof By Gauri Deshpande (गोफ)
Gof By Gauri Deshpande (गोफ)
वपु ही आद्याक्षर मराठी माणसाच्या मनाच्या खूप जवळ आहेत... त्यांच्या कथांनी वाचकांच्या मनावर गारूड केल... त्यांच्या काही कथांभोवती, वेगवेगळ्या लेखकांनी एकांकिकेच्या आविष्काराचा गोफ विणला... या गोफातून घडत जीवनाच व्यामिश्र दर्शन कधी एखादी लोकलमध्ये भेटलेली तरूणी स्वप्नवत वाटते... तर कधी एका लहान मुलीचा करूण अंत होतो... कधी एखादा फेरीवाला मुलासारखा जीव लावतो... तर कधी नवरा बायकोच अर्थहीन नात अस्वस्थ करून जात... भांडणाच्या क्लासची कल्पनाही समोर येते एखाद्या एकांकिकेतून... तर भावाभावांच्या नात्यातील गैरसमज मानवी मनाच वास्तव चित्र रेखातून जातो... एखाद्या सोनटक्केवर नियती घाव घालते... किती ही गुंतागुंत भावनांची आणि त्यामुळे होणारी घुसमट माणसाच्या मनाची वपुं च्या कथांच हेच वैशिष्ट्य अधोरेखित करणारे हे एकांकिकांचे नवरंग प्रभावी संवाद आणि भावनांचे पडसाद हे या नवरंगांच सामर्थ्य कथा ते एकांकिका असा हा प्रवास वाचकांना नक्कीच लुभवणारा फॉर्म आणि आशय यांच नात उलगडून दाखवणारा वाचा आणि अंतर्मुख व्हा...