Skip to product information
1 of 1

God News Aahe By Dr. Arun Gadre (गुड न्यूज - डॉ. अरूण गद्रे )

God News Aahe By Dr. Arun Gadre (गुड न्यूज - डॉ. अरूण गद्रे )

Regular price Rs. 297.50
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 297.50
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

मातृत्व व बाळंतपण हे सनातन काळापासून माणसाच्या जीवनाचे व संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. अवघ्या दोनशे वर्षांपूर्वी येथे दर तीन गर्भार स्त्रियांपैकी एक स्त्री बाळंतपणात मृत्यू पावत होती. त्यामुळे बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म' ही कल्पना आजही कुठेतरी प्रत्येकाच्या सुप्त मनात दडलेली आहे.मात्र गेल्या पन्नास वर्षात काळ कुठून कुठे गेला आहे! तंत्रज्ञान व विज्ञानानं प्रचंड झेप घेतली आहे. गर्भारपण व बाळंतपण या क्षेत्रातही तंत्रज्ञान व विज्ञानाचं खूप आक्रमण झालेलं आहे. मोठ्या शहरात बाळंतपण घरी होणं हे जवळपास दिसेनासं होतय. प्रेग्नन्सी आता एक 'मेडिकल इव्हेन्ट'... 'डॉक्टरी बाब' झाली आहे.तर, तसं उरलं नाही ही वस्तुस्थिती आहे. अनुभवी, जुन्या जाणत्याबायका आता पहिलटकरणीच्या जवळपास नसतात. एकेकटी बायको...अशा छोट्या परिघात ती स्त्री जेव्हा प्रेग्नन्ट होते, एका खूप काही गोंधळाला आणि चिंतेला जन्म देताना दिसते. खरं पाहता, विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीनं  आता बाळंतपण, गर्भारपण खूपच सुरक्षित झालं आहे..!पण ते तेवढं आनंदी... नैसर्गिक राहिलं आहे का? स्त्री हल्ली करीअर करणारी आहे. ती चार भिंतीत बंदिस्त नाही. जास्त वेळा गर्भारपण आता परवडत नाही. एकच. वा फार तर दोन! साहजिकच आता खूप काही अपेक्षांचं ओझं या गर्भारपणावर, बाळंतपणावर व पर्यायानं स्त्रीरोगतज्ज्ञावर पडू लागलं आहे!

पाने 350

View full details