Goat Days (Marathi) By Benyamin (गोट डेज)
Goat Days (Marathi) By Benyamin (गोट डेज)
Couldn't load pickup availability
आखाती देशांत जायचे, भरपूर पैसे कमवायचे आणि मायदेशातल्या
कुटुंबियांना सुखात ठेवायचे या आकांक्षेने तिथे जाणाऱ्या लाखो
लोकांपैकी एक म्हणजे केरळात मजुरी करणारा नजीब. त्याची आखाती
आकांक्षा सफल झाली की स्वप्नरूपातच राहिली ?
त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कधी निसर्गाने तर कधी
मानवाने, प्राणच पणाला लावले. त्यातूनही तो निभावून गेला, कसा?
कोणत्या श्रद्धांमुळे? जसा होता तसा राहिला की ?
मानवी आयुष्याची संभवनीय परिवर्तने आणि मूलभूत मूल्ये, यांचे
चित्तवेधक दर्शन या कादंबरीत घडते.
‘गोट डेज’ मल्ल्याळी भाषेत प्रकाशित झाली आणि अल्पावधीत
बेस्ट सेलर या वर्गात मोडली जाऊ लागली. मल्ल्याळी साहित्यातील एक
अत्यंत तेजस्वी असे व्यक्तिमत्व म्हणजे बेन्यामिन. त्यांची उपरोधीक आणि
प्रसंगी हळुवार होणारी शैली नजीबच्या आयुष्याची वाळवंटी वंचना,
बघता बघता, एकाकीपणा आणि परकेपणा, यांचे वैश्विक परिणाम कसे
बनते ते समर्थ रीतीने उभे करते.
या पुस्तकाच्या मल्याळम आवृत्तीच्या तीन लाखाहुन अधिक प्रतींची
विक्री झालेली आहे.