Goa Maharashtratil Patrakarita By Kamil Parakhe (गोवा महाराष्ट्रातील पत्रकारिता)
Goa Maharashtratil Patrakarita By Kamil Parakhe (गोवा महाराष्ट्रातील पत्रकारिता)
Couldn't load pickup availability
समाजाच्या सर्वच क्षेत्रांत पत्रकार वावरत असतात. प्रकाशझोतात असलेल्या आणि नसलेल्या व्यक्तींच्या संपर्कात बातमीदार येत असतात. यापैकी सर्वच व्यक्तींना आणि घडलेल्या प्रसंगांना दैनिकांच्या पानांवर जागा मिळत नाहीे. बातम्यांचा पाठलाग करत असताना पत्रकाराला अनेकदा बरेच काही मागे ठेवावे लागते. असेच हातचे राखून ठेवलेल्या घटनांना आणि व्यक्तींनाही मग कधीकाळी शब्दांमध्ये साकार करावे लागते. इंग्रजी दैनिकांत चार दशके काम केलेल्या कामिल पारखे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील आपले अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. पूर्व युरोपात बल्गेरिया येथे पारखे यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. बातमीदार आणि उपसंपादक म्हणून ‘द नवहिंद टाइम्स’ (पणजी, गोवा), ‘लोकमत टाइम्स’ (औरंगाबाद) आणि पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि सकाळ वृत्तसमूहाच्या ‘महाराष्ट्र हेराल्ड’-‘सकाळ टाइम्स’ या दैनिकांत त्यांनी काम केले आहे.
Share
