Goa Aani Maharashtratil Patrakaritetalya Katha By Kamil Parakhe (गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा)
Goa Aani Maharashtratil Patrakaritetalya Katha By Kamil Parakhe (गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा)
Couldn't load pickup availability
दैनंदिन बातमींचा आणि स्पेशल स्टोरींचा रतीब घालण्याच्या कामातून इतर पानांसाठी, स्तंभासाठी किंवा पुरवणीसाठी लिहायला वेळ नाही अशी सबब अनेक बातमीदार सांगत असतात. पणजीला असताना मी मात्र नवहिंद टाइम्सच्या संपादकीय पानासाठी आणि रविवारच्या पुरवणीसाठीही लेख लिहायचो, त्याशिवाय आमचे जुळे भावंड असलेल्या ‘नवप्रभा’ या मराठी दैनिकासाठीही लिहायचो. हिच सवय मी पुढे ‘इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’त, महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स’मध्ये चालू ठेवली. या अवांतर लिखाणाचा मला किती फायदा झाला हे आज असे मागे वळून पाहताना लक्षात येते. याचे कारण म्हणजे या वेळोवेळी लिहिलेल्या लेखांतच माझ्या भावी इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची बीज होते, या लेखांतूनच माझ्या पुढील सर्व इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची निर्मिती झाली. या पुस्तकाच्या विविध प्रकरणांतून वर उल्लेख केलेल्या पत्रकारितेच्या वेगवेगळ्या अंगांची, विविध बिट्सची आणि कामकाजपद्धतीची झलक दिसेल. - कामिल पारखे
Share
