Gharbhar Darwalnara Sugandh By Eknath Avhad (घरभर दरवळणारा सुगंध )
Gharbhar Darwalnara Sugandh By Eknath Avhad (घरभर दरवळणारा सुगंध )
Couldn't load pickup availability
बऱ्याच वेळा बालसाहित्यिक आपल्या बालपणीच्या ऐवजावरच लिहीत राहतात. पण इथे लेखक सतत मुलांच्या सान्निध्यात असल्यामुळे बदलत्या पिढीप्रमाणे त्यांची कथा बदलत गेलेली दिसते.
यातील कथांमधून भाऊ-बहीण, मित्र-मैत्री यांसारख्या नात्यांचा गौरव केला आहे. तर, ‘गर्वाचे घर’मध्ये बालवयात नकळत निर्माण झालेल्या अहंकाराचा प्रभाव लेखक खेळीमेळीने दाखवून देतो. ‘माझ्यासाठी तीच विठाई’मध्ये मुलांमधला उपजत समजूतदारपणा दिसतो. ‘थिरकले चिमुकले पाऊल’मध्ये वारली नृत्याविषयीची आस्था निर्माण होईल असे केले आहे. प्राणिजीवन, भूतदया, निसर्गाकडे बघायचा निकोप दृष्टिकोन याकडेही लेखक चिमुकल्यांचे लक्ष वेधतो.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतानाच वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाविषयी सतत बोललं जात असतं. अत्यंत संवेदनशील अशा बालवयात ‘बालवाचक’ निर्माण करायचं महत्त्वाचं काम एकनाथ आव्हाडांच्या हातून होत आहे.
Share
