Gavati Samudra By Conrad Richter, Shanta Shelke(Translators) (गवती समुद्र)
Gavati Samudra By Conrad Richter, Shanta Shelke(Translators) (गवती समुद्र)
Couldn't load pickup availability
‘द सी ऑफ ग्रास’ या इंग्रजी कादंबरीचा ख्यातनाम कवयित्री आणि अभ्यासू लेखिका शान्ता शेळके यांनी केलेला ‘गवती समुद्र’ हा हृद्य अनुवाद आहे. ही साधी-सोपी गोष्ट आहे अमेरिकेतील सॉल्ट फोर्वÂ या गावातली. ल्यूटी कॅमेरॉन- जॉय ब्यू्रटन-जिम ब्य्रूटन या तीन प्रमुख पात्रांभोवती ही कथा गुंफली आहे. जॉय ही कथा आपल्याला निवेदन करतो. कर्नल जिम उंचापुरा- भारदस्त- शिस्तप्रिय- सर्वांवर करडा वचक असलेला सदगृहस्थ असतो. विस्तीर्ण पसरलेल्या गवताच्या कुरणात जॉयच्या काकाचा पशुपालनाचा व्यवसाय असतो. हे कुरण जिमने निर्वासितांच्या वसाहतीसाठी द्यावे, यासाठी कोर्टात केस सुरू असते. सरकारी वकील ब्राइस चेम्बरलेन याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे हे विशाल कुरण निर्वासितांच्या वसाहतीसाठी देण्यासंबंधी सूतोवाच केलेले असते. जॉयच्या काकाचे- कर्नल जिमचे- ल्यूटीशी लग्न होणार असते. ल्यूटी शिक्षणासाठी जॉयला शहरात पाठवण्याची व्यवस्था करते. त्यामुळे जॉयच्या मनात होणाऱ्या काकूविषयी गैरसमज निर्माण होतो. काकाच्या आदेशानुसार तो तिला आणायला रेल्वे स्टेशनवर जातो. ल्यूटीची साधी, सुंदर छबी आणि मनमोकळा स्वभाव पाहून जॉयच्या मनात तिच्याविषयी आदरयुक्त आकर्षण निर्माण होते. कुरणाविषयी कोर्टात सुरू असलेली केस सुरुवातीला कर्नल जिंकतो. दरम्यान कर्नल-ल्यूटीच्या संसारवेलीवर ब्रॉक-जिमी ही दोन मुले आणि सारा बेथ ही मुलगी अशी तीन फुले उमलतात. कर्नलचा कुरणावरील वसाहतीला विरोध पाहून ल्यूटी घर सोडण्याचा निर्णय घेते. आपले मातृवत छत्र दुरावल्यामुळे जॉयला दु:ख होते. कर्नल मात्र निर्धाराने हा धक्का पचवतो
Share
