Gavatalya Goshti By N. D. Mahanor (गावातल्या गोष्टी)
Gavatalya Goshti By N. D. Mahanor (गावातल्या गोष्टी)
Couldn't load pickup availability
गावखेड्यातील माणसांच्या सुखदुःखाच्या गोष्टी. काळजाला भिडणाऱ्या, मन सुन्न करणाऱ्या.. 'गावातल्या गोष्टी' वाचल्या. या कथा वर्तमान परिस्थितीतील तळागाळातला अनुभव परखडपणाने मांडतात. या पुस्तकातील पहिल्या चार कथा वाचून मला जी. ए. कुलकर्णी यांची आठवण झाली. या कथा तंत्रदृष्ट्याही अतिशय उत्कृष्ट आहेत. त्या वाचून झाल्यावर कथांचा विषय डोळ्यांपुढे तरंगत राहतो. 'सवंगडी' ही कथा वाचून ग्रामीण जीवनात काढलेल्या माझ्या लहानपणाची आठवण झाली आणि डोळे भरून आले. यशवंतराव चव्हाण 'गावातल्या गोष्टी' हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि अथपासून सुरू केल्यावर इति केव्हा आलं ते कळलंच नाही. या गोष्टींमध्ये ग्रामीण जीवनाची भेदक चित्रं आहेत. संवेदनशील मन असलेल्या तुमच्यासारख्या कलावंताच्या हातून असा कारुण्याचा सूर उमटणं अपरिहार्य आहे. सत्ताधाऱ्यांनी स्वार्थापोटी सर्वसामान्य माणसाला एकतर भिकारी किंवा गुंड बनवण्याचा जो उद्योग चालवला आहे तो पाहिल्यावर तुकोबांसारखं 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' असं म्हणण्यापलीकडे काही सुचत नाही.
Share
