Skip to product information
1 of 1

Gapsap By N.D.Mahanor (गपसप)

Gapsap By N.D.Mahanor (गपसप)

Regular price Rs. 85.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 85.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

पळसखेड परिसरातल्या अस्सल लोककथांचा ना. धों. महानोरांच्या रसाळ लेखणीतून उतरलेला गावरान आविष्कार लोकजीवनाचं, लोकसंस्कृतीचं, सुखदुःखाचं, निसर्गाचं आणि अस्सल विनोदाचं मौखिक लोकसाहित्य ऐकताना मी अनेकदा चकित झालो आहे. लिखित साहित्याच्या आधी हे मौखिक साहित्यच लोकरंजनाचं काम करत होतं. थकल्याभागल्या माणसांची मरगळ दूर करण्याचं, त्यांचं दुःख हलकं करण्याचं, त्यांना उल्हसित करण्याचं आणि परंपरेने चालत आलेलं शहाणपण सांगण्याचं काम लोकसाहित्याच्या कर्त्यांनी आजवर केलं आहे. आजच्या आधुनिक साहित्याची बीजं या लोकसाहित्यातच दडलेली आहेत. गपसप हे आमच्या पळसखेडच्या परिसरातील गावकऱ्यांनी मला ऐकवलेल्या लोककथांचं संकलन. या कथांमध्ये गावखेड्यांतल्या मोकळ्याढाकळ्या संस्कृतीचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं.

View full details