Ganyamagchya Goshti By Pravin Davane (गाण्यामागच्या गोष्टी)
Ganyamagchya Goshti By Pravin Davane (गाण्यामागच्या गोष्टी)
Couldn't load pickup availability
एखादं गाणं तुम्ही ऐकता तेव्हा त्या गीतनिर्मितीमागे अनेक हकिकती दडलेल्या असतात. काही गंभीर तर काही गमतीदार! या हकिकती जेव्हा त्या गीताचा कवीच सांगतो, तेव्हा त्यांना मोठं महत्त्व प्राप्त होतं. एका अर्थाने संगीतकार, गायक, कवी यांनी निर्माण केलेला तो इतिहासच असतो. तेव्हा या पुस्तकात ‘गाण्यामागच्या गोष्टी’ सांगून त्या आठवणींना प्रवीण दवणे यांनी जो उजाळा दिला आहे, तो एकप्रकारे इतिहास्व आहे. त्यांच्या शब्दांतील ‘नादमय तेजोब्रह्म हे’, ‘दे साद दे हृदया’, ‘मुक्या हुंदक्यांचे गाणे कुणाला कळावे’, ‘श्री अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली’ अशी अनेक गाणी मी गायली आहेत. ‘जिवलगा’ चित्रपटासाठी तर आशाताई भोसले यांच्यासह सर्वच गाणी मी गायली आहेत. या गाण्यांप्रमाणेच ‘गाण्यामागच्या गोष्टी’ या त्यांच्या पुस्तकावरही वाचक प्रेम करतील असा विश्वास वाटतो.
सुरेश वाडकर
Share
