Gadkille Ani Mi By Dr. Sangram Indore
Gadkille Ani Mi By Dr. Sangram Indore
Couldn't load pickup availability
गडकिल्ले आणि मी = छत्रपती शिवरायांच्या आणि गडकोटांच्या उत्कट प्रेमापोटीच महाराष्ट्रभर पसरलेल्या साधारण चारशे गडकोटांपैकी १०१ गडकिल्ल्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी देऊन, इतिहासाच्या जीर्ण कागदपत्रांमध्ये दडलेला इतिहास रात्रंदिवस एक करून शोधून काढून "गडकिल्ले आणि मी" हा ग्रंथ डॉ. संग्राम इंदोरे यांनी जन्माला घातला आहे. या ग्रंथातला साल्हेर हा नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर उभा आहे तर पारगड कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र गोवा सीमेवर जंगलात दडला आहे. या मधल्या सह्याद्रीच्या प्रचंड पसाऱ्यात बुद्धिबळाच्या पटावरच्या सैन्यांसम पसरलेल्या गडकोटांच्या अनगड वाटा आपल्याशा करणं, गडकोटांचा एकूण एक कोपरा धुंडाळणं, त्याची नोंद करणं आणि त्या गडकोटांवरील अवशेषांचे सुंदर फोटो घेणे हे अत्यंत जिकीरीचं कार्य. पण डॉक्टरांनी ते अतिशय उत्तम रित्या जमवलं. त्यांच्या ओघवत्या लिखाणाला त्यांच्याच सुंदर छायाचित्रांनी चार चांद लावले आहेत. दुर्गराज राजगड= या पुस्तकात किल्ले राजगडाचे आणि महत्त्व हे गडाच्या रुपासह या पुस्तकरुपी ग्रंथात सांगितले आहे.
Share


