Skip to product information
1 of 1

Gaavgadyatil Gangot By Ad. Balasaheb Khopde (गावगाड्यातील गणगोत)

Gaavgadyatil Gangot By Ad. Balasaheb Khopde (गावगाड्यातील गणगोत)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

व्यक्तिरेखा शब्दातून साकार करण्याची कला वाटते तितकी
सोपी नसते. त्या व्यक्तीशी नातं जुळवून घ्यावं लागतं;
समरस व्हावं लागतं. तिला आपलंसं करावं लागतं. त्या जीव
लावण्यातूनच ती व्यक्ती आपल्या जवळ येते, आपलीच होऊन
जाते. हा असा आपलेपणा या लेखनातून अनुभवता येतो.
ग्रामजीवनात वावरणाऱ्या माणसांचं जगणं, त्या जगण्यातल्या
तन्हा, तन्हेवाईकपणाचे नमुने, नमुन्यांच्या नोंदी, नोंदीतले
तपशील अस्सल आहेत. त्यांची भाषाही अनुरूप,
साजेशी आहे. हे सगळं जगण्यातून आलेलं आहे.
लेखकाच्या जगण्याचा दुवा त्याच्याशी जोडलेला आहे.
जोडकामाची जुगलबंदी, जीवाला जीवश्च वाटावी इतका जीव
ओतण्याचा लेखकाचा प्रयास हा प्रतिभेलाही प्रसन्नता प्रदान
करण्याइतपत प्रासादिकतेकडे झुकणारा आहे.
गावपण अनुभवण्याच्या या जणू सगळ्या आठवणीच आहेत
असं या लेखनाचं स्वरूप आहे. व्यक्तिरेखा उभी करण्याची
हातोटी हृद्य आहे. ज्याच्या मनात आई जिवंत असते
त्याचं मन गावगाड्यातल्या गणगोतातच गुंतलेलं असतं.
त्याच गणगोताचं हे पंचांग आहे!
बाळासाहेब खोपडे यांचं हार्दिक अभिनंदन !
फ. मुं. शिंदे

View full details