Ful Umalala, Vishva Badlala By Dr. Mandar N. Datar ( फुल उमललं विश्व बदललं )
Ful Umalala, Vishva Badlala By Dr. Mandar N. Datar ( फुल उमललं विश्व बदललं )
Couldn't load pickup availability
फुलणाऱ्या वनस्पती आपल्या भवतालाचा अविभाज्य भाग आहेत.
आपण आसपास डोकावून पाहिलं तर ज्या वनस्पती दिसतात
त्यातल्या शेवाळी, नेची वगैरे वगळता बहुतांश आहेत फुलणाऱ्या किंवा
सपुष्प वनस्पती. आपलं धान्य, फळे, भाज्या या सर्वांचा उगम
फुलणाऱ्या वनस्पतींमध्येच आहे.
पूर्वीपासूनच आपण औषधांसाठीही सपुष्प वनस्पतींवर अवलंबून आहोत.
आपल्या सभोवतालच्या रंगीबेरंगी सृष्टीचे श्रेय देखील याच वनस्पतींना जाते.
पूर्वी, कपडे आणि इतर वस्तू रंगवण्यासाठी देखील
याच वनस्पतींपासून मिळणाऱ्या नैसर्गिक रंगांचा वापर केला जात असे.
गजऱ्यांपासून ते अत्तरांपर्यंत सर्व सुगंध सपुष्प वनस्पतींचेच आहेत. थोडक्यात,
सपुष्प वनस्पती आपल्या मानवी जगाला केवळ गरजेच्या गोष्टीच देत नाहीत,
तर आपल्या अस्तित्वाला आधारही देतात.
तर मग चला, या वनस्पतींच्या उत्क्रांतीचा, विविधतेचा आणि
विस्ताराचा एक रंजक प्रवास करून त्यांच्याविषयी सचित्र जाणून घेऊयात...
Share
