Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
भारतावर राज्य करण्याची जबाबदारी ब्रिटिश वंशावर नियतीने कशी काय सोपवली हे एक अतक्र्य, अगम्य असे गूढच आहे.` —रुड्यार्ड किपलिंग `भारतातील ब्रिटिश सत्तेवर आपण आपल्याच हाताने उदक सोडत आहोत. आपण आपल्याच हाताने हा धोंडा पायावर पाडून घेत आहोत. त्यातून होणारी हानी आपल्या दृष्टीने अंतिम व आपल्या एकूण अस्तित्वाला धोक्यात आणणारीच ठरेल. यथावकाश, आपल्याला जगातील एक किरकोळ प्रतीची सत्ता बनवणा-या एका प्रक्रियेची ती सुरुवातच ठरणार यात मला तर शंका वाटत नाही.` — विन्स्टन चर्चिल हाऊस ऑफ कॉमन्स मधील एका भाषणात फेब्रुवारी१९३१ `नियतीशी आपण अनेक वर्षांपूर्वी एक करार केलेला होता. आज तो क्षण आला- आपल्या वचनबद्धतापूर्तीचा. त्या वेळी केलेली आपली ती प्रतिज्ञा आज पूर्ण होत आहे... आजच्या या दिवशी, जेव्हा घड्याळात मध्यरात्रीचा टोला पडेल, त्या वेळी जग झोपेत असेल एकीकडे पण आपल्या भारतात मात्र प्रत्येक जण एका नव्या जीवनाचा व स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी जागा असेल. इतिहासात असा एखादा क्षण येतो, पण तोही क्वचितच! त्या क्षणी आपण `जुने जाऊ द्या मरणालागुनि` म्हणत एका नव्या वळणावर पदार्पण करतो. तो क्षण असतो एका युगान्ताचा, राष्ट्रात्म्याच्या जागृतीचा - ज्याचा आवाज सतत दाबून धरण्यात आलेला होता - हुंकार कानी पडण्याचा हा एक अलौकिक क्षण आहे.` —जवाहरलाल नेहरू १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताच्या घटना समितीसमोर भाषण करताना
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books