Firyad By Dadasaheb Patil (फिर्याद)
Firyad By Dadasaheb Patil (फिर्याद)
Couldn't load pickup availability
फिर्याद !! एक वास्तव आणि चित्तथरारक कादंबरी, जी ग्रामीण भागातील जगण्याच्या कठोर वास्तवांना तोंड देते. तुरुंगवासाला कारणीभूत ठरलेल्या भयंकर घटनांवर तुरुंगात असतानाच लिहिलेलं हे एक कठोर आत्मचरित्र आहे, ज्यात नायकासहित सर्वांचेच कठोर परीक्षण केले आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून आपण सर्वजण जगतो, त्या व्यवस्थेवर देखील ही कादंबरी प्रश्नचिन्ह उभी करते आणि म्हणूनच, ही कादंबरी म्हणजे वाचकांसमोर केलेली एक आर्त फिर्याद आहे.
तुरुंगवास हा नेहमी दुहेरी असतो. आरोपीला शिक्षा होते; मात्र त्याच वेळेस त्याच्या कुटुंबाचा जो वनवास सुरू होतो, तो तुरुंगापेक्षा कमी नसतो. वर्चस्ववादी मानसिकतेतून कित्येक पिढ्या बर्बाद झाल्या आहेत. मी या कथेचा एक भाग आहे म्हणून नाही, तर निव्वळ एक वाचक म्हणून अनेकदा हे पुस्तक वाचले आहे. खोलवर विचार करायला लावणारी, खूप काही शिकवणारी आणि मनाला भिडणारी ही कादंबरी एकदा हातात घेतली की वाचून संपेपर्यंत खाली ठेवावीशीच वाटत नाही