Baji Pasalkar, Prataprao Gujar, Ramji Pangera By Prashant Kulkarni (बाजी पासलकर, प्रतापराव गुजर, रामजी पांगेरा )
Baji Pasalkar, Prataprao Gujar, Ramji Pangera By Prashant Kulkarni (बाजी पासलकर, प्रतापराव गुजर, रामजी पांगेरा )
Couldn't load pickup availability
पाने - ८०
बाजी पासलकर हे मोसे खोर्यातील भारदस्त व्यक्तिमत्त्व होते. जुलमी सुलतानी राजवट संपवून न्यायाचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्या शिवरायांच्या महान यज्ञातील पहिली समिधा म्हणजे बाजी पासलकर होय!
हिंदवी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर एक धाडसी वीर होते. त्यांचे मूळ नाव कुडतोजी होते. त्यांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन शिवरायांनी त्यांना 'प्रतापराव' हा किताब दिला अन् पुढे हेच नाव रूढ झाले. साल्हेर येथे खुल्या मैदानात त्यांनी मुघलांचा पराभव केला.
रामजी पांगेरा यांच्या पराक्रमामुळे त्यांचे वर्णन शिवभारतात परमानंदानी 'अग्नीप्रमाणे वीर' असे केले आहे. कण्हेरगडावर रामजी पांगेरा यांच्या अवघ्या सातशे सैनिकांनी मुघल सरदार दिलेरखानाच्या हजारोंच्या सैन्याच्या तोंडचे पाणी पळवले.शेवटी दिलेरखानाला माघार घ्यावी लागली!
Share
