Skip to product information
1 of 1

Family Budget (Marathi) By Vinayak Kulkarni

Family Budget (Marathi) By Vinayak Kulkarni

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

आवक जावक, जमाखर्च हे शब्द वरकरणी रुक्ष वाटले तरी जीवन व्यवहारात अतिशय महत्त्वाचे आहेत. संसाराचा गाडा सुरळीतपणे चालवायचा म्हणजे जमाखर्चाचा ताळेबंद मांडायला हवाच ! घरातील कर्त्या व्यक्तींनी एकत्र बसून आर्थिक अंदाजपत्रक आखले पाहिजे. आपली मिळकत आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी काटेकोर नियोजनाची गरज आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाचे फॅमिली बजेट असणे आणि त्यानुसार खर्चाची तरतूद करणे आवश्यक आहे. हे फॅमिली बजेट कसे आखावे, त्यासाठी नेमके कोणते मुद्दे विचारात घ्यावे, वयाच्या कोणत्या टप्प्यावर बचतीचा मार्ग निवडावा, खर्च करताना नेमके प्राधान्य कशाला द्यावे, कुटुंबातील ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य विमा कसा आवश्यक आहे, पारंपरिक बचतीच्या पर्यायांबरोबर नवीन उपाय कोणते, अशा विविध गोष्टींचे सखोल मार्गदर्शन देणारे हे पुस्तक आहे. याबरोबरच दिव्यांग व्यक्तींसाठी आर्थिक आखणी, आधुनिक विचारसरणी असलेल्या तरुण तरुणींसाठी आर्थिक नियोजन, ज्येष्ठ नागरिकांचे लिव्हिंग विल, त्यांच्या वाढत्या खर्चाचे नियोजन, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे.

View full details