Fakirche Vaibhav - Eka Karyakartyache Wedanakathan By Vijay Yashwant Vilhekar(फकिरीचे वैभव : एका कार्यकर्त्याचे वेदनाकथन )
Fakirche Vaibhav - Eka Karyakartyache Wedanakathan By Vijay Yashwant Vilhekar(फकिरीचे वैभव : एका कार्यकर्त्याचे वेदनाकथन )
Couldn't load pickup availability
लेखक शेतजमीन नांगरावी तसं आपलं आयुष्य नांगरतो. आयुष्य नांगरताना बहुजीवांचं जगणं उलगडत जातं. त्यातलं काय पकडू आणि काय सोडू असं होतं. तरीही उपेक्षितांचा, विस्थापितांचा अंतर्दाहच आपलासा वाटत राहतो. त्यातूनच चुंबकाप्रमाणे वेदना मनाला खेचून घेते. मग तीच वेदना शब्दातून पाझरू लागते.
तिफणीतून बियाणं पेरत जावं तसं अक्षरांच्या ओळी कागदावर पेरल्या जातात.
शब्द घेऊन त्या उगवतात आणि फकिरीचे वैभव काय असतं याचं दर्शन घडवतात.
कार्यकर्ता जेव्हा सर्वस्वी स्वतःला झोकून देत दुःखीतांचं दुःख हलकं करण्यासाठी झटतो तेव्हा तो खर्या अर्थाने उपेक्षित-पीडितांच्या वेदनांनी होरपळून निघतो. पण वेदनांची ही धग त्याला आणखी बळ पुरवते आणि तो पुन्हा पुन्हा नव्या जोमाने लोकांसाठी झटत राहातो... स्वतःला फकीर बनवत... कारण ही फकिरी
त्याला श्रीमंत करत राहाते माणूस म्हणून... कार्यकर्ता म्हणून... त्याचसाठी भूकेलेल्या एका कार्यकर्त्याचं हे वेदनाकथन... त्याच्यातल्या वैभवसंपन्न फकिराचं दर्शन घडवणारं... एकदा वाचायलाच हवं असं सत्यकथन!
Share
