Evdhech De By Pooja Diwaan (एवढेच दे - पूजा दिवाण )
Evdhech De By Pooja Diwaan (एवढेच दे - पूजा दिवाण )
Couldn't load pickup availability
मनोगत
वयाच्या १३-१४ वर्षी कवितेने माझे बोट धरले व आज या कवितासंग्रहापर्यंत मला आणून पोचवले. तिच्या बरोबरचा माझा प्रवास म्हणजे माझ्याच भावनांच्या अक्षर शिल्पांबरोबरचा प्रवास. हा प्रवास मला खूप समृद्ध करणारा होता.
कवितेचे संस्कार माझ्यावर खूप लहानपणापासूनच घडत गेले. आम्हा भावडांना झोपवताना माझे वडील ती. बापू त्यांच्या स्वतःच्या व इतर नामवंत कर्वीच्या कविता म्हणायचे. त्या वेळी रुजलेले हे कवितेचे बीज अंकुरत गेले ते संपूर्ण कुटुंबातील साहित्यिक वातावरणामुळे. म्हणूनच आज हा कवितासंग्रह प्रकाशित होताना माझ्या संपूर्ण कुटुंबाचे हे साहित्याचे, रसिकतेचे ऋण मी सविनय मान्य करते. माझे पती दिनेश व मुलगी गुणाली यांची तीव्र इच्छा होती की हा कवितासंग्रह प्रकाशित व्हावा! त्यांच्या साथीशिवाय ही वाटचाल अवघड होती. त्यांचे आभार मानणे म्हणजे स्वतःचेच आभार मानण्यासारखे होईल. पण माझा कवितेचा वारसा गुणालीच्या माध्यमातून फुलतोय यातील आनंद मात्र अवर्णनीय आहे.
या कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटचालीत माझ्या कुटुंबा व्यतिरिक्त माझी मैत्रिण व चित्रकार स्वरूपा भोसले हिची मोलाची व रेखीव साथ मला मिळाली व पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ साकारले. तिचेही मनःपूर्वक आभार.
पुस्तकातील Highlighter म्हणून ज्या चारोळ्या आहेत त्यांची कॅलिग्राफी श्री. हंकारे सर यांनी करून दिली व त्यासाठी सुयोग्य रेखांकने श्री सचिन मुळे यांनी करून दिली त्या दोघांचेही मनःपूर्वक आभार.
सर्व सुहृदयांच्या शुभेच्छातून साकारलेला हा कवितासंग्रह रसिकार्पण करताना मी कृतज्ञतेच्या भावनेने समृद्ध होत परमेश्वराची प्रार्थना करते.
'एवढेच दे'
पाने 96
Share
