Engineerchi Gosht By Vishal Avachite (इंजिनिअरची गोष्ट)
Engineerchi Gosht By Vishal Avachite (इंजिनिअरची गोष्ट)
Couldn't load pickup availability
दरवर्षी हजारो इंजिनिअर पदवी घेऊन बाहेर पडतात, मात्र योग्य दिशा, मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे त्यांची अनेक स्वप्नं धुसर होतात. "इंजिनिअरची गोष्ट" हे अशाच एका सामान्य तरुणाचं अनुभवाधिष्ठित कथन आहे – ज्यात संघर्ष आहे, धडपड आहे, आणि प्रत्येक वळणावर शिकण्यासारखी मौल्यवान शिदोरी आहे. हे पुस्तक आत्मकथन नसून, शालेय शिक्षणानंतर करिअर निवडण्यापासून ते नोकरीत यशस्वीपणे उच्चपदी स्थिरावण्यापर्यंतचा एक रोमांचक प्रवास आहे. करिअर नियोजन, आवश्यक स्किल्स, टेक्निकल नॉलेज, मुलाखतीची तयारी आणि कॉर्पोरेट जगतातील वास्तव समजून घेण्यासाठी यातील स्वअनुभवावर आधारित केलेलं कालसुसंगत व्यावहारिक मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या, मर्यादित साधनांमध्येही मोठं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाची ही खरीखुरी व आपली वाटणारी कहाणी – आजच्या तरुणाईला दिशा, प्रेरणा आणि नवी उमेद देणारी ठरेल. विद्यार्थी, पालक, इंजिनिअर, नवउद्योजक किंवा जॉब शोधणारे इंजिनिअर, नोकरी करणारे इंजिनिअर – सर्वांसाठीच हे पुस्तक एक विश्वासार्ह मार्गदर्शक आणि प्रेरणादायी सोबती ठरेल!
Share
