Eka Dishecha Shodh By Sandeep Wasalekar
Eka Dishecha Shodh By Sandeep Wasalekar
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Unit price
/
per
राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर आणि डॉ. सदानंद बोरसे यांनी २५व्या आवृत्तीच्या निमित्ताने मला या नवीन घडामोडींबाबत लिहिते केले याचा मला आनंद वाटतो. दिलीपरावांचा शब्द हा मी आज्ञेसमान मानतो, कारण वाचक आणि समाजाला काय हवे याची उत्तम जाण त्यांना आहे. या पुस्तकाचे वाचक म्हणून माझ्या संपर्कात आलेले सचिन इटकर पुढे माझे मित्र झाले. २५व्या आवृत्तीच्या निमित्ताने या पुस्तकात काही भर घालावी, म्हणून ते रात्रंदिवस मला आग्रह करत आले आहेत. २०१० मध्ये मी हे पुस्तक लिहावे, याबाबत आग्रही असलेले श्रीकांत मेणजोगे यांनीही २५व्या आवृत्तीच्या निमित्ताने मी पुस्तकात काही ताज्या विषयांवर लिहावे असे सुचवले. या दोघांचाही मी मन:पूर्वक ऋणी आहे. माझी सहकारी आणि स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपची सहसंस्थापक इल्मास फतेहअली हिने या नव्या लेखनासाठी नवे विषय, त्यांचे विश्लेषण आणि नव्या दिशा ठरवण्यात मला केलेली मदत माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे. - संदीप वासलेकर