Eeye Aksharanchiye Nagari By Dr. Pradip Karnik (इये अक्षरांचिये नगरी)
Eeye Aksharanchiye Nagari By Dr. Pradip Karnik (इये अक्षरांचिये नगरी)
Couldn't load pickup availability
प्रा. रमेश तेंडुलकर, श्री. विश्वास पाटील आणि अरुण टिकेकर ही त्रिमूर्ती दैवते माझ्या आयुष्यात आली आणि माझी ‘अक्षरनगरी’ची सफर अनोखी झाली. ग्रंथ, ग्रंथकार आणि नियतकालिके यांना माझ्या ४०-४५ वर्षांच्या वाङ्मयीन कालखंडात अपूर्व आणि मध्यवर्ती स्थान आहे. यापैकी कोणता तरी एक घटक मध्यवर्ती असल्याशिवाय मला लिहिताच येणार नाही असे वाटते. अर्थात माझे काका रवींद्र दुर्वे, माझा भाऊ श्री. सुनील कर्णिक, श्री. अरुण नेरुरकर, डॉ. नीतीन रिंढे, प्रा. रमेश वरखेडे, श्री. चंद्रकांत भोंजाळ (यांच्यावर तर स्वतंत्र लेख मला लिहायचा आहे. हिंदी
साहित्याचे विश्व यांनीच मला जवळून दाखवले.) सतीश काळसेकर, अशोक मुळे यांच्यासारखे प्रकाशक मित्र, ‘सदर’ लेखक-मित्र, संपादक, चित्रकार, मुद्रित शोधक, मुद्रणकार, विक्रेते अशा अनेकांनी माझे ग्रंथविश्व समृद्ध केले. श्री. दत्तात्रेयांनी २४ गुरू केले होते असे म्हणतात. मला तर
या ‘अक्षरनगरी’त हजार गुरू लाभले.
Share
