Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक राजकारणाची जडणघडण जाणून घेण्याच्या दृष्टीने दुस-या महायुद्धाच्या इतिहासाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण हिटलरच्या आक्रमक हुकुमशाहीविरुद्ध झुंज घेण्यासाठी लढल्या गेलेल्या या संघर्षाच्या अखेरीस, या विशाल समराचे दायित्व अंगावरघेणा-या राष्ट्रांची पुरी दमछाक झाली आणि त्यामुळे रणांगणावर विजयश्री मिळवूनही, राजनैतिक आघाडीवर त्यांच्या पदरी अपयश आले. त्याचप्रमाणे दुस-या एका साम्राज्यावादाला बळ प्राप्त करून द्यायलाही हा संघर्ष कारणीभूत ठरला. दुस-या महायुद्धाच्या कालखंडात युरोपीय आणि जागतिक राजनीतीने अनेक वळणे घेतली; इतकी की महायुद्धोत्तर जगाचे रूपच पालटून गेले. त्यामुळे केवळ, अनेक राष्ट्रांना आपली धग पोचविणारा संघर्ष एवढेच दुस-या महायुद्धाचे स्वरूप मर्यादित नसून, आंतरराष्ट्रीय राजकारणातील नवे तणाव आणि पेच यांच्यामधील प्रेरणा समजावून घेण्याच्या दृष्टीनेही दुस-या महायुद्धाच्या कालखंडाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books