Skip to product information
1 of 2

Draupadi : Kal ! Aaj ! Udya ! By Ashok Samel (द्रौपदी : काल ! आज ! उद्या !)

Draupadi : Kal ! Aaj ! Udya ! By Ashok Samel (द्रौपदी : काल ! आज ! उद्या !)

Regular price Rs. 850.00
Regular price Rs. 1,000.00 Sale price Rs. 850.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

राजा शंतनू आणि स्वर्गीय गंगा यांच्या मिलनातून जन्मलेला राजपुत्र देवव्रत याने जेव्हा 'भीष्म प्रतिज्ञा' केली, तेव्हा महाभारताच्या आंतरिक संघर्षाला सुरुवात झाली. सभापर्वातील द्रौपदी सांगण्यावरून तिचा मनबंधू श्रीकृष्ण याची यदशिष्टाई मुद्दामहून न करण्यातून महासत्तेच्या विलयाला सुरुवात झाली. 
द्रौपदीचे आयुष्यातील महानाट्य हे धगधगत्या पालित्यासारखे कालातीत होते. जन्मोदरी ती अग्निशिखा होती, बालपणी ती याज्ञसेना होती, विवाहप्रसंगी द्रुपदकन्या द्रौपदी होती, स्वयंवरानंतर पाच पांडवांची जगनघना पतिव्रता पांचाली होती आणि पुन्हा वस्त्रहरणाच्या वेळी तळपत्या तलवारीसारखी मनोयज्ञयागातून निर्माण झालेली अग्निशिखा होती...! अशी तिची विविधांगी गर्भित रूपे अशोक समेळ यांनी निखालसपणे आपल्या शब्दकुंचल्याने ज्वलंत चितारलेली आहेत...!
द्रौपदीच्या मनातील सालाचा उगम प्रलयात होतो आणि पंचमहाभूतांच्या ओंकारात विलय होऊन पुन्हा अरुवारीच्या विलसत्या किरणांप्रमाणे तिचे मूलाधार व्यक्तिमत्व कादंबरीभर झळकत राहते, ही या कादंबरीची मर्मबंधातली ठेव आहे...!
                                                                                                   ---- प्रा. अशोक बागवे 

View full details