Draupadi:Indraprasthachi Samradyni [Bhag-3 ] By Sonali Raje (द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी-समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन -भाग ३ )
Draupadi:Indraprasthachi Samradyni [Bhag-3 ] By Sonali Raje (द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी-समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन -भाग ३ )
Couldn't load pickup availability
आपल्या रजःस्वला बहिणीला केसांनी ओढून नेऊन तिची सार्वजनिक विटंबना केली जाते, हे कळल्यावर द्रौपदीचा भाऊ, उत्तमौजस, काय प्रतिज्ञा करतो? द्रौपदीचे माहेरघर तिच्या आयुष्यातील सर्वांत वाईट परीक्षेत तिला कशी साथ देते?
द्रौपदीची लाज राखणाऱ्या साडीचं पुढे काय झालं? वनवासाच्या काळात पांडवांच्या साथीनं तिचं अनोळखी आणि धोकादायक वाटांवरून मार्गक्रमण करणारं रूप, एक साम्राज्ञी, प्रेमळ पत्नी आणि प्रेमळ आईपासून ते एक शूर तलवारधारी होऊन तिच्या शत्रूचा नाश करणाऱ्या तिच्या या रौद्र अवतारावर मंत्रमुग्ध होण्यासाठी तयार राहा.
राक्षसांच्या कुळांमध्ये जातीय दंगल उसळू नये म्हणून हिडिंबा आणि मौरवी यांच्याशी सखोल संबंध प्रस्थापित करताना त्यांच्या सुसंस्कृत राजकीय मुत्सद्देगिरीचे साक्षीदार व्हा.
सोनाली राजे यांनी लैंगिक शोषणाची विकृती आणि प्रवृत्ती कशी ठेचून काढली, हे महाभारतातील द्रौपदी-कीचक आणि अर्जुन-उर्वशी या पीडित-अपराधी जोड्यांच्या माध्यमातून, आपल्या प्रकरणांत अधोरेखित केली आहे.
कर्मठ आणि निर्भय अशा योद्ध्या राणीला भेटा; जी स्वाभिमान राखण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणत्याही पुरुषाची वाट पाहत नाही. स्वतः साठी आणि आजूबाजूच्या इतर स्त्रियांच्या सन्मान रक्षणासाठी द्रौपदी खंबीरपणे कशी उभी राहते ते पाहा. तिच्या आयुष्याच्या नीचांकात तिच्याबरोबर पावले उचला.
Share
![Draupadi:Indraprasthachi Samradyni [Bhag-3 ] By Sonali Raje (द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी-समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन -भाग ३ )](http://pustakvishva.com/cdn/shop/files/THE_EMPRESS_OF_INDRAPRASTHA_Nadir_Book_Marathi_F.jpg?v=1750143333&width=1445)