Dr. Keshav Sathaye Book set ( Madhyamantale Divas + Sura Mi Vandile + Diggaj( ३ पुस्तकांचा संच )
Dr. Keshav Sathaye Book set ( Madhyamantale Divas + Sura Mi Vandile + Diggaj( ३ पुस्तकांचा संच )
Couldn't load pickup availability
1) माध्यमांतील दिवस' | डॉ केशव साठये| पाने - २१४
माध्यमांतील दिवस' हे डॉ केशव साठये यांचे पुस्तक म्हणजे टीव्ही , रेडिओ ,जाहिरात क्षेत्रातील प्रवासाचा एक अनोखा जागर आहे .
सामाजिक माध्यमांच्या गदारोळात , कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन होत असताना डॉ साठये यांनी रंगवलेली ही मैफिल स्मरणरंजना बरोबर माध्यमांच्या भविष्याचा वेधही वस्तुनिष्ठपणे घेताना दिसते.
दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मितीचे विविध पैलू समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
मुंबई दूरदर्शन , पुणे आकाशवाणी ,फिल्म इंस्टिट्यूट यांची सैर घडवत सवाई गंधर्व , मॅजेस्टिक गप्पा , पुणे नगर वाचन मंदिर , ब्रिटिश लायब्ररी यांचे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्या समोर उभे करण्याची किमया या पुस्तकात साधली आहे . लेखकाला माध्यम प्रवासात भेटलेली माणसे ,हे लेखन वाचता वाचता आपली होऊन जातात हा या पुस्तकाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.
ज्येष्ठ लेखिका डॉ करुणा गोखले यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाचे मोल अधोरेखित करणारी आहे .
2)सूरा मी वंदिले | लेखक - डॉ. केशव साठये
पाने - २१२
भारतीय संस्कृती ही जगात देदीप्यमान म्हणून ओळखली जाते याचे कारण ती प्राचीन आहे म्हणून नव्हे तर चौसष्ट कलांनी युक्त आहे म्हणून यातील सर्वाना आवडणारी कला म्हणजे संगीत होय.
सूरा मी वंदिले हे पुस्तक भारतीय संगीत कलेच्या अभिजातपणा बद्दल बोलतेच शिवाय उपशास्त्रीय, सुगम संगीतातील पाऊलवाटांचे दिशादर्शनही करते. शास्त्रीय संगीत ही भारतीय परंपरा किती महान आहे हे या पुस्तकातून समोर आलेल्या गायक-गायिकांच्या संगीत साधनेतून समोर येते. हाच टप्पा पुढे नेत डॉ. केशव साठये यांनी सिनेसंगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत यांचा सुरेख गोफ या पुस्तकात विणला आहे आणि हे भावबंध वाचकांसमोर उलगडले आहेत. राग-अनूराग या प्रकरणातून हिंदी चित्रपट गीतांवर शास्त्रीय संगीताचा असलेला ठसा सहज सोप्या उदाहरणातून देत वाचकांना संगीत साक्षर करण्याचा हा प्रयत्न दाद द्यावी असाच आहे .
हिंदी चित्रपट संगीतातील संगीतकार, कवी यांबरोबरच शास्त्रीय - उपशास्त्रीय संगीतातील कवी, गायक-गायिकांच्या सूरेल प्रवासाची ही एक शब्दगाथा म्हणता येईल.
3) दिग्गज | लेखक - डॉ. केशव साठये
पाने - २३५
देशाची जडणघडण ही आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमधून होते हे खरे . पण त्याहीपेक्षा ती सांस्कृतिक उत्थानातून आणि अथक संशोधन परंपरेतून अधिक होते. ध्येयाने प्रेरित झालेला माणूस विपरीत परिस्थितीत सुद्धा डोंगराएवढे काम करु शकतो याचा वस्तुनिष्ठ दाखला देणारे हे पुस्तक आहे. लेखक, कवी, प्राध्यापक, समीक्षक, उद्योजक, इतिहासकार, चित्रकार, छायालेखाकार, समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, शिक्षणतज्ञ हीच देशाची खरी संपत्ती असते हे अधोरेखित करणारे हे पुस्तक म्हणजे विद्वत्ता, कार्यमग्नता, माणुसकी आणि चांगुलपणा यांचा उचित सन्मान करणारा लेखन ऐवज आहे . दिग्गज हे डॉ. केशव साठये यांचे पुस्तक खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि देश घडवलेल्या महान विभूतींचे कृतज्ञतापूर्वक केलेले शब्दस्मरण आहे.
Share
