Dr. Babasaheb Ambedkaranchi C. N. Shivtarkar Mastaranna Patre Sankalan, Sanshodhan Va Sampadan | Vijay Surwade (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सी. ना. शिवतरकर मास्तरांना पत्रे संकलन, संशोधन व संपादन : विजय सुरवाडे)
Dr. Babasaheb Ambedkaranchi C. N. Shivtarkar Mastaranna Patre Sankalan, Sanshodhan Va Sampadan | Vijay Surwade (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सी. ना. शिवतरकर मास्तरांना पत्रे संकलन, संशोधन व संपादन : विजय सुरवाडे)
Couldn't load pickup availability
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सी. ना. शिवतरकर मास्तरांना पत्रे संकलन, संशोधन व संपादन
असं म्हटलं जातं की पत्र हा मनाचा आरसा असतो आणि पत्रांमधून
ते लिहिणाऱ्या व्यक्तीचे अंतरंग कळते. भाषणात किंवा लेखनात
विचारांना एक प्रकारचा बंदिस्तपणा येतो किंवा मर्यादा येतात. त्या
मर्यादा किंवा बंदिस्तपणा पत्रात व्यक्त केलेल्या विचारांना नसतो.
पत्रात प्रकट केलेल्या विचारांना एक प्रकारची सहजता असते.
प्रांजळपणा असतो. पत्रात कृत्रिमतेला वाव नसतो म्हणून पत्रातून
कळकळ, लोभ, राग, चिंता, आपुलकी आदि भाव सहजपणे प्रकट
होतात. ती पत्रे महापुरुषांची असतील तर त्यांना ऐतिहासिक
दस्तऐवजांचं रुप प्राप्त होते. त्या दृष्टीने पाहता डॉ. आंबेडकरांनी
शिवतरकर मास्तरांना लिहिलेल्या पत्रांना अनन्यसाधारण महत्त्व
आहे. ही पत्रे डॉ. आंबेडकरांच्या मनोभावांचे अनेक पैलू उघड करतात.
डॉ. आंबेडकरांनी आपले उभे आयुष्य अस्पृश्यांना माणुसकी, समता
मिळवून देण्याकरिता खर्च केले. पण त्याचबरोबर त्यांनी राष्ट्र
हितालाही तितकेच प्राधान्य दिले याची प्रचिती या पत्रामधून प्रत्ययास
येते.
डॉ. आंबेडकरांच्या भूमिका, भावना आणि आंबेडकरी चळवळ यांचा
अभ्यास करणाऱ्या आणि आस्था बाळगणाऱ्या प्रत्येकानेच वाचावा
असा दस्तऐवज!
Share
