Skip to product information
1 of 4

Dr. Amey Pangarkar Book set ( 4 books) - (Sahaj Sope Digital Marketing + Ai Chya Batvatun + Sahaj Sope Cyber Security + Sahaj Sope Prompt Engineering )(माहितीपर पुस्तक ४ पुस्तकांचा संच )

Dr. Amey Pangarkar Book set ( 4 books) - (Sahaj Sope Digital Marketing + Ai Chya Batvatun + Sahaj Sope Cyber Security + Sahaj Sope Prompt Engineering )(माहितीपर पुस्तक ४ पुस्तकांचा संच )

Regular price Rs. 1,126.00
Regular price Rs. 1,325.00 Sale price Rs. 1,126.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language version
Author

1) Sahaj Sope Digital Marketing- पाने - २८८ | 350/-

डिजिटल मार्केटिंगसारख्या आधुनिक आणि गतिशील क्षेत्रावर प्रथमच मराठीत सुलभ भाषेत लेखन झालेले हे पुस्तक 'सहज सोपे डिजिटल मार्केटिंगविद्यार्थ्यांसाठीउद्योजकांसाठीस्टार्टअप संस्थापकांसाठी तसेच डिजिटल मार्केटिंगमध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. डॉ. अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सखोल संशोधन करूनअनेक केस स्टडीजसह डिजिटल मार्केटिंगचे प्रत्येक टप्पे सोप्या भाषेत मांडले आहेत. त्यामुळे हे पुस्तक या क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्यांनादेखील या क्षेत्रात रुची निर्माण करते. या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा देत सर्वांना या उत्कृष्टपणे अभ्यासपूर्वक लिहिलेल्या पुस्तकाची शिफारस करतो.

अच्युत गोडबोले
भारतीय लेखकटेक्नोक्रॅट

2) AI Chya Batvyatun - पाने - १४४ | 275/-

( AI च्या बटव्यातून ) रोजच्या वापरातील सहज सोपी AI टूल्स. पद्मभूषण डॉ.विजय भटकर Vice Chancellor , नालंदा विद्यापीठ "Al च्या बटव्यातून" या पुस्तकाद्वारे 45 विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या 170+ Al टूल्सचा सर्वसमावेशक संग्रह उलगडला आहे. ही टूल्स तुम्हाला गुणवतेचा वेग वाढवण्यासाठी, तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतील आणि तुमची व्यावसायिक वाढ वृद्धिंगत करण्यासाठी तसेच या वाढत्या गुंतागुंतीच्या विज्ञानेस इकोसिस्टममाये अग्रेसर राहण्यासाठी मदत करेल. या टूल्सची सफर करत असताना, तुम्ही पाहाल की AI बुद्धिमान चॅटवॉट्सद्वारे संभाषणाला कसा आकार दिला जात आहे. प्रगत अल्गोरिदम सिफारसी वैयक्तिकृत करत आहे, भविष्यसूचक विश्लेषणाद्वारे पुरवठा साखळी ऑटिपाइ होत आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, सेयर मार्केट, सेती, स्वयंपाक घर इ. या प्रकारात दाखवलेले प्रत्येक टूल नाविन्यता आणि कार्यक्षमतेचे नवीन स्तर उलगडण्यासाठी पहिली पायरी करते. डेटावर आधारित निर्णय घेण्यासाठी आणि यशाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल.

3) सायबर सिक्युरिटी | लेखक - अच्युत गोडबोले, डॉ. अमेय पांगारकर
पाने - २६४ | 350/-

'सायबर सिक्युरिटी' म्हणजे फक्त संगणक प्रोग्रामर किंवा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचं काम नाही. ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण डिजिटल जग हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. या पुस्तकात आपण सायबर सिक्युरिटीचा इतिहास, सायबर सिक्युरिटीशी निगडित महत्त्वाच्या संज्ञा, आजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटीचं महत्त्व, आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीचे उपाय आणि भविष्यातली जागरूकता याबद्दल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्याबरोबरच तुम्हांला सायबर हल्ल्यांचे विविध प्रकार समजतील. फिशिंग, हॅकिंग, ओळख चोरी, डिजिटल अरेस्ट, UPI आणि ई-कॉमर्स फसवणूक, डीपफेक, जॉब स्कॅम्स आणि अजून बरंच काही ! प्रत्येक प्रकरण सोप्या उदाहरणांसह लिहिल्यामुळे वाचक फक्त माहितीच मिळवणार नाहीत, तर ते आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वापरू शकतील असे उपाय घेऊन जातील.

श्री. कैलाश काटकर
चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, क्विकहील टेक्नॉलॉजी लिमिटेड

Book Available After 13 december 2025

सहज सोपे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग। लेखक - डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर, प्रसाद कुलकर्णी 
पाने - २८० - 350/-

आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. माहिती शोधणे असो, कंटेंट तयार करणे असो किंवा जटिल निर्णय घेणे असो—AI आपल्याला सतत मदत करत आहे. पण या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाचा सर्वाधिक परिणामकारक वापर कसा करायचा? या प्रश्नाचे मूळ उत्तर आहे—प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग.

AI कडे प्रश्न विचारणे ही फक्त विनंती नसून, एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. योग्य प्रॉम्प्ट म्हणजे सुरीला स्वर—AI त्यावर अद्भुत संगीत निर्माण करते. चुकीचा प्रॉम्प्ट म्हणजे विसंगत सूर—परिणामही तितकाच विस्कळीत.
या सूक्ष्म पण प्रभावी विज्ञानाची सखोल, प्रायोगिक आणि सोपी ओळख करून देणे—यासाठी ‘सहज सोपे Prompt Engineering’ हे  महत्वाकांक्षी पुस्तक  आम्ही वाचकांसमोर ठेवत आहोत.
या पुस्तकात आपण जाणून घ्याल— प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची नेमकी व्याख्या आणि तत्त्वे, AI च्या कार्यपद्धतीला योग्य दिशेने मार्गदर्शन कसे करावे, विविध प्रकारचे प्रॉम्प्ट्स—निर्देशात्मक, संवादात्मक, विश्लेषणात्मक, सर्जनशील ,मार्केटिंग, कोडिंग, कंटेंट, स्टार्टअप, डिझाइन, शिक्षण, HR, संशोधन… अशा अनेक क्षेत्रांती, प्रॉम्प्ट्सचे वास्तविक उपयोग,  सूक्ष्म तांत्रिक बाबी, उदाहरणे आणि प्रत्यक्ष वापरातील अचूक टिप्स. या सर्वांचा सामायिक उद्देश—
“प्रत्येक वाचकाला AI चा प्रभावी वापरकर्ता नव्हे, तर एक सक्षम प्रॉम्प्ट इंजिनिअर बनवणे.”

View full details