Dnyaneshwaritil Jeevsrushti By Manisha Phadke, Ravin Thatte, Uma Patki (ज्ञानेश्वरीतील जीवसृष्टी)
Dnyaneshwaritil Jeevsrushti By Manisha Phadke, Ravin Thatte, Uma Patki (ज्ञानेश्वरीतील जीवसृष्टी)
Couldn't load pickup availability
तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वरीत आहे तेवढे जीवसृष्टीचे वैविध्यपूर्ण वर्णन आणि दर्शन जगातल्या कुठल्याही दुसऱ्या ग्रंथात नाहीच नाही. शेवटी तत्त्वज्ञान ही गोष्ट माणूस नावाच्या जीवाला सांगितली जात असली, तरी जैविकता ही गोष्ट वनस्पती आणि इतर प्राण्यांमध्ये देखील उपस्थित असते. त्या जीवांचे आयुष्य माणसाइतके प्रगल्भ नसेलही, परंतु त्यांच्या स्वभावातले आणि वर्तनातले गुणदोष आपल्यातही असतात आणि त्यांची उदाहरणे देऊन ते माणसाला दाखवून जर समजावून सांगितले तर तत्त्वज्ञान समजणे जास्त सुकर होते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ. ह्या सर्वसमावेशकतेमुळे तो ग्रंथ जास्त रसपूर्ण, वाचनीय, वेधक आणि असामान्य झाला आहे हे निर्विवाद आहे. जीवसृष्टीचा एक विशिष्ट अधिवास आहे आणि त्यात ढवळाढवळ करू नये हे आता सगळ्यांनाच पटले आहे. तसेच प्राण्यांचे आणि त्यांच्या शरीराचे उदाहरण देऊन माणसांना हिणवणे आता शिष्टसंमत नाही. हे पुस्तक संकलित करताना ह्या बाबी जेव्हा ध्यानात घेतल्या गेल्या तेव्हा ज्ञानेश्वरकालीन समजुती निराळ्या होत्या आणि त्या त्याही पूर्वीपासून प्रचिलत होत्या हे ध्यानात घ्यावे लागले. महाभारतात सपर्सत्रात सरपटणाऱ्या प्राण्यांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला गेल्याची कथा आहे. (लेखकांच्या प्रस्तावनेतून