Dinakararao Jawalkar Samagra Vangmay By Dr. Y. D. Fadke ( दिनकरराव जवळकर समग्र वाड्.मय )
Dinakararao Jawalkar Samagra Vangmay By Dr. Y. D. Fadke ( दिनकरराव जवळकर समग्र वाड्.मय )
जवळकरांच्या लेखनात एक अंगभूत उत्छृंखलपणा आणि बेफिकिरी आढळते. त्याचे फायदे व तोटे त्यांनी भोगले. विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना ते वयाने फारच तरुण होते. कदाचित हा त्याचाही परिणाम असेल. वि. रा. शिंदेंसारख्या विचारवंतांकडून ज्या प्रकारच्या तात्त्विक मांडणीची आपण अपेक्षा करतो तशी जवळकरांकडून करूही नये. पण याचा अर्थ जवळकरांकडे वैचारिकता नव्हती असा मात्र कोणी करू नये. त्यांच्या भाषेने त्यांच्या वैचारिकतेवर नेहमीच मात केल्यामुळे ती सहजासहजी दृग्गोचर होत नाही एवढेच. विशेषतः विलायतेच्या वाऱ्या करून आल्यावर त्यांना झालेले आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे व राजकारणाचे आकलन-स्तिमित करून सोडणारे आहे. या काळात जवळकर एखाद्या शोकात्मिकेच्या नायकासारखे वावरताना दिसतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मर्मस्थानांचा फायदा घेऊन ब्राह्मणेतरांमधील बुजुर्ग मुत्सद्यांनी त्यांचे तारू भरकटवले खरे, त्याचा उपयोग कामगार चळवळीतील फूट पाडण्यासाठी करून घेण्यात आला हे ही निःसंशय. परंतु ते तितक्याच त्वरेने सावरले ही गोष्ट अधिक महत्त्वाची मानली पाहिजे. 'कैवारी' आणि 'तेज' मधील त्यांचे लेख वाचले असता त्यांचा हा प्रवास समजून येतो.
डॉ. सदानंद मोरे