1
/
of
1
Diggaj 1 By Deepa Deshmukh (दिग्गज १)
Diggaj 1 By Deepa Deshmukh (दिग्गज १)
Regular price
Rs. 374.00
Regular price
Rs. 440.00
Sale price
Rs. 374.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
दीपा देशमुख लिखित 'दिग्गज' हे पुस्तक सर्व वयोगटातल्या वाचकांसाठी असून जगाला नवी दिशा देणाऱ्या ६०हून अधिक असामान्य व्यक्तींच्या जीवनात डोकावण्याची संधी यामुळे वाचकाला मिळणार आहे. या नभोमंडलातजसे अगणित तारे लुकलुकतात, त्या सगळ्यांची संख्या मोजणं अशक्य आहे; त्याचप्रमाणे या जगात अशी काही माणसं आहेत आणि होऊन गेलीत, ज्यांचं कार्य या तेजोमय ताऱ्यांसारखंच आहे. त्यांच्या कल्पनांनी आणि योगदानाच्या प्रकाशानं हे जग अनेक युगं उजळून निघालं आहे. अशा या व्यक्तींनी आपल्या अद्वितीय कौशल्याने आणि समर्पित वृत्तीने इतिहासाच्या पानावर आपली अमिट छाप सोडली आहे ! 'दिग्गज' या पुस्तकातून साहित्य, कला, विज्ञान, गणित, स्थापत्य, चित्र-शिल्पकला, संगीत, समाजकारण आणि राजकारण यांसारख्या विविध क्षेत्रांतल्या प्रतिभासंपन्न व्यक्तींच्या कार्याचा आणि जीवनाचा अद्भुत प्रवास वाचकाला घडणार आहे.या पुस्तकातलं प्रत्येक पान वाचकाला या प्रेरणादायी दीपस्तंभांच्या अथक परिश्रमांची, ध्येयाची आणि समाजासाठी काहीतरी भरीव करण्याच्या तीव्र इच्छाशक्तीची ओळख करून देईल. त्यांच्या कल्पनांनी, प्रयत्नांनी आणि परिश्रमांनी हे जग कसं बदललं; त्यांच्या शोधांनी मानवी जीवनाला एक नवी उंची कशी दिली आणि त्यांच्या कलेने आपल्या मनात कसा आनंद निर्माण केला; हे सारं वाचकाला 'दिग्गज'मध्ये वाचायला मिळेल.दीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशित 'दिग्गज' भाग १ आणि भाग २ अशी ही दोन पुस्तकं स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द मनात निर्माण करणारी ठरतील आणि जीवनातल्या समस्या, अडथळे यांना सामोरं जात एक सखोल, व्यापक दृष्टिकोन देतील, अशी खात्री वाटते.
Share
