Skip to product information
1 of 2

Didada By Dr. Aditi Kalmekha (दिडदा )

Didada By Dr. Aditi Kalmekha (दिडदा )

Regular price Rs. 149.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 149.00
12% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity


अदिती काळमेख या कवयित्रीच्या या काही तरल प्रेमकविता. ही कवयित्री प्रेमही जगली आहे आणि कविताही जगली आहे. येथे प्रेम आणि कविता यांच्यामध्ये द्वैत उरलेले नाही. प्रेमातील उत्कटता, उत्कंठा, ओढ, मिलन, निरोप, वियोग, ताटातूट या सर्व अनुभूती या कवितांमध्ये आहेत. या कवितांना अनुभूतीचा गंध आहे आणि अभिव्यक्तीचे सहज सामर्थ्य आहे.

प्रेम आणि कविता या दोहोंसाठी आत्यंतिक संवेदनशीलता असावी लागते. ती येथे आढळते. या कविता निःसंकोचपणे शृंगाराच्या आहेत. या कवितांना शारीर प्रणय वर्ज्य नाही. पण शृंगाराच्या अभिव्यक्तीमध्ये कुठेही उथळपणा नाही, वा मर्यादांचे उल्लंघन नाही. शिवाय, येथे प्रणयाची अशारीर स्पंदने-आंदोलने आहेतच.

बाह्य सृष्टीतील घटनांचे स्वरूप शब्दांत बांधण्यासाठी देखील भाषेचे फार मोठे लावण्य असावे लागतेच, पण अंतर्यामीच्या सूक्ष्म भावभावनांचे आणि खास करून प्रणयासारख्या नाजूक अनुभवांचे तरंग शब्दांकित करण्यासाठी हवी असलेली प्रतिभाशाली आणि सौंदर्यवती शब्दकळा हे या कवितांचे एक मोहक वैशिष्ट्य आहे.

- डॉ. आ. ह. साळुंखे. ज्येष्ठ विचारवंत, सातारा.

View full details