Dhyeyavadi Shiksanakarmi By Shivaji Ghogre
Dhyeyavadi Shiksanakarmi By Shivaji Ghogre
Couldn't load pickup availability
शिक्षण हा एक संस्कार मानला तर त्या संस्काराचा मुख्य शिल्पकार शिक्षक आहे. सदविचार, सदाचार,सद्गगुण,सद्भावना आणि समुपदेशन यांचा एकत्रित मिलाफ म्हणजे शिक्षक. संपूर्ण समाजाची प्रेरणा, प्रोत्साहन,आणि धारणा ही शिक्षक आहे. ज्ञाननिष्ठा,विद्यार्थिनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजनिष्ठा या सर्वांचे प्रतीक म्हणजे शिवाजीराव घोगरे सर.शिवाजीराव घोगरे सर हे न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर या विद्यालयातून ३३ वर्षे सेवा करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. पिंपळे, जेऊर व अष्टापुर या तिन्ही विद्यालयांमध्ये त्यांनी आपली सेवा केली एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले घोगरे सर यांचे जन्मगाव दौंडज. या छोट्याशा गावात सरांनी आपल्या व्यक्तीमत्वाची जडणघडण केली. घोगरे सर एका ध्येयाने पछाडलेला ध्येयवेढा माणूस. प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेल्या ३१ वर्षातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा निश्चितच सर्वांना होईल. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारा विशेष कृतज्ञता गौरवग्रंथ "ध्येयवादी शिक्षणकर्मी" सर्वानी नक्की वाचावा !!!