Dhuranchya Resha By Jayashri Dani (धुरांच्या रेषा)
Dhuranchya Resha By Jayashri Dani (धुरांच्या रेषा)
Couldn't load pickup availability
जीवन जगत असताना आसपास घडणाऱ्या विविध घटना व प्रसंग मनावर भले बुरे प्रभाव पाडत असतात. ते अनुभव खोलवर रुजतात. कधी चटकन उगवतात तर कधी कितीतरी वर्षांनी अभिव्यक्त होतात. अशाच मनात, स्मृतिकोशात जमा झालेल्या आठवणी अनेक कथांच्या रूपाने बाहेर आल्यात. कधी कधी तर या कथा लिहितांना अचंबित व्हायला लागतं की इतकं आपल्या मनात साचून होतं? पाहिलेल्या, टिपलेल्या दृश्यांपलीकडचं बरंच काही दिसायला लागतं आणि साहित्यात उमटतं. माझ्या पिढीने जसा आई-आजीचा व्रत वैकल्याचा गंधाळलेला काळ जवळून पाहिला आहे तसाच आजच्या युगातली आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचाही अवलंब केला आहे. त्या नव्या जुन्या गोष्टींची सुयोग्य सरमिसळ घेऊन माझ्या या कथा येतात. कथांना स्त्री जाणिवांचे पदर आहेत, संस्कृतीचा सुरेख स्पर्श आहे तसेच बदलत्या काळाची परिमाणे व समस्यांचाही उहापोह आहे. उमलत्या पिढीतील मुलांचा सशक्तपणा दर्शविणारी कथा यात आहे तर दुसऱ्या विवाहानंतरही अनिश्चीततेच्या दोलायमान जगात वावरणारी कुसुमही इथे आहे. स्त्रीला आलेले आत्मभान, आभासी जगातली तिची कुचंबणा, तिचे तडफडणे असे विविध विषय इथे मांडले आहेत. स्त्री असो वा पुरुष, त्यांच्या नाजूक मनोव्यापाराशी निगडित अनेक प्रश्न, भावभावनांचा अचूक वेध घेण्याचा या कथांमध्ये यशस्वी प्रयत्न केलेला आहे.